हैदराबादHarmonyOS Next :Huawei नं Google च्या Android पासून वेगळे होण्याची घोषणा केलीय. कारण कंपनीनं आता चीनमध्ये आपली नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम HarmonyOS Next ची घोषणा केली. अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्ट (AOSP) पासून या ऑपरेटिंग सिस्टमला स्वतंत्रपणं विकसित केलेलं आहेत. तसंच Hongmeng कर्नल आणि सिस्टम आर्किटेक्चरवर तयार, नवीन HarmonyOS Next Huawei मुळं स्मार्टफोनसह टॅबलेट आणि स्मार्टवॉची कार्यक्षमता सुधारणार आहे.
Huawei नं चीनमधील Kirin आणि Kunpeng चीपद्वारे समर्थित त्यांच्या उपकरणांसाठी HarmonyOS Next ची सार्वजनिक बीटा चाचणी अधिकृतपणे सुरू केली. या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल असं सांगितलं जात आहे की हे नवीन होम आणि लॉक स्क्रीन कस्टमायझेशन पर्याय, वेगवान ॲनिमेशन आणि ॲप लॉन्च स्पीड आणि एआय-पावर्ड फीचर्ससह येईल.
Huawei ने AliPay, JD.com, Taobao, Douyin आणि Xiaohongshu ने नवीन OS साठी नेटिव्ह ॲप्स विकसित केलं आहं म्हणून HarmonyOS Next वर स्थलांतरित होण्यासाठी प्रमुख चीनी खरेदी, पेमेंट आणि सोशल मीडिया सेवांमध्ये कोणतीही समस्या नाही. HarmonyOS Next मध्ये 15,000 पेक्षा जास्त ॲप्स आहेत असून आणखी लवकरच येणार आहेत, असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
HarmonyOS Next या डिव्हाइसला सपोर्ट करेल
स्मार्टफोन :
Huawei Mate 60
Huawei Mate 60 Pro
Huawei Mate 60 Pro+
Huawei Mate 60 RS अल्टीमेट डिझाइन
Huawei Mate X5
Huawei Mate
Huawei पुरा 70