जेरुसलेम : इस्रायलच्या सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा खात्मा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा याह्या सिनवर असल्याचा दावा इस्रायलच्या सैन्यानं केला. याह्या सिनवर याचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्ता इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दुजोरा दिला आहे. हमासचा म्होरक्या मारला गेला असला, तरी आमचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही. आम्ही आमच्या सगळ्या ओलिसांना घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
#WATCH | " yahya sinwar, the leader of the hamas terrorist organization who was responsible for the october 7 massacre, is dead... our work is not done. we will not rest until we bring home all our hostages by any means. we will continue to operate until we complete all our… pic.twitter.com/CVLhcZQAcI
— ANI (@ANI) October 17, 2024
अजून युद्ध पूर्ण झालं नाही - डॅनियल हगारी : इस्रायली सैन्यानं हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याचा खात्मा केला. मात्र अद्यापही आमचं काम पूर्ण झालं नसल्याचा दावा आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं. यावेळी बोलताना आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, "7 ऑक्टोबरच्या हत्याकांडाला हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवार हा जबाबदार होता. त्यामुळे इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात याह्या सिनवर याचा मृत्यू झाला आहे. आमचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. आम्ही आमच्या सर्व ओलिसांना घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इस्रायलच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आम्ही मिशन पूर्ण होईपर्यंत काम करू.
नागरिकांची हत्या केली, महिलांवर बलात्कार केले : यावेळी बोलताना आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की, गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला. तेव्हा या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांची घरात घुसून हत्या केली. महिला, मुलींवर बलात्कार केले. संपूर्ण कुटुंबांना जिवंत जाळलं. हमासच्या दहशतवाद्यांनी तब्बल 250 पेक्षा अधिक इस्रायली नागरिकांना ताब्यात घेऊन बंधक बनवलं. इस्रायलवरील सगळ्यात क्रूर हल्ल्यासाठी याह्या सिनवर हा जबाबदार होता. अद्यापही 101 नागरिक गाझामध्ये बंधक आहेत. त्यामुळे आम्ही याह्या सिनवरला शोधून काढून आम्ही त्याचा खात्मा केला. आम्ही गाझातील नागरिकांशी नाही, तर हमासच्या दहशतवाद्यांसी युद्ध केलं. त्यामुळे आम्ही गाझातील नागरिकांना अन्न, पाणी आणि औषधांसह इतर साहित्य पुरवत मदत करत आहोत, असंही डॅनियल हगारी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- हमासचा म्होरक्या टिपला; इस्राईलनं इस्माइल हनीयेहला घरात घुसून 'ठोकलं', अंगरक्षकाचाही खात्मा - Ismail Haniyeh Killed In Tehran
- इस्रायल हमास युद्धात युनायटेड नेशन्सचा पहिला बळी ; भारताचे सुपुत्र निवृत्त कर्नल वैभव काळे यांना गाझामध्ये वीरमरण - Colonel Vaibhav Kale Killed In Gaza
- गाझा प्रार्थनास्थळावर इस्रायलचा हवाई हल्ला; 18 जणांचा मृत्यू - ISRAELI AIRSTRIKE IN GAZA MOSQUE