हैदराबाद Who is Noel Tata : नोएल टाटा (67) यांची टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. नोएल टाटा, हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्यानंतर आता नोएल टाटा ट्रस्टच्या अंतर्गत कंपन्या चालवणार आहेत. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टशी संबंधित संस्थांचं नेतृत्व करण्यासाठी नोएल यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते आता टाटा ग्रुपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
टाटा ट्रस्टचे विश्वस्त : नोएल टाटा हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ही एक टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक धर्मादाय संस्था म्हणून, रतन टाटा यांच्या टाटा ट्रस्टच्या मंडळाला विद्यमान विश्वस्तांमधून नवीन अध्यक्ष नियुक्त करणं आवश्यक होतं.
नोएल टाटांची अध्यक्षपदी नियुक्ती : रतन टाटा यांनी मृत्यूपूर्वी कोणत्याही उत्तराधिकाऱ्याचं नाव घोषित केलं नव्हतं. त्यामुळं नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे. नोएल टाटा यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळं, सर्व भागधारकांना संदेश पाठवला गेला आहे. संस्थापक कुटुंबातील एक सदस्य संस्थेचं नेतृत्व करत आहे. त्यांनी 2023 या आर्थिक वर्षात अंदाजं 56 दशलक्ष डॉलरची देणगी दिली आहे.
नोएल टाटांचं करिअर : नोएल एन. टाटा सध्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. नोएल गेल्या चार दशकांपासून टाटा समूहाचा एक भाग आहे. ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. तसंच त्यानी टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अलीकडंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
हे वाचलंत का :