तेहरान : इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर शनिवारी सकाळी ड्रोनने हल्ला केल्याचे वृत्त अरब मीडियाने दिले आहे. कतारी मीडिया आउटलेटने वृत्त दिले आहे की हिजबुल्लाहने सीझेरिया प्रदेशाच्या दिशेने सोडलेले ड्रोन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर धडकले. इस्त्रायली सैन्यानं सिझेरिया येथील इमारतीवर ड्रोन हल्ला केल्याची पुष्टी केली आहे.
Lebanese brothers targeted Netanyahu's residence in a drone attack pic.twitter.com/EZWp5hgneG
— Iran Military (@IRIran_Military) October 19, 2024
नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ हल्ला : इस्रायली माध्यमांनी घटनास्थळाचे कोणतेही फुटेज प्रकाशित केलेले नाही. शनिवारी सकाळी, झिओनिस्ट सूत्रांनी इस्रायली राजवटीचे प्रमुख बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती दिली. या घटनेनंतर अनेक जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळील एका इमारतीला ड्रोनने धडक दिल्याचे वृत्त आहे. अजून कोणताही तपशील जाहीर झालेला नाही.
ड्रोनला रोखण्यात अयशस्वी : एक दिवस आधी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमास नेता याह्या सिनवार याच्या हत्येला दुजोरा दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीजेरिया भागात काही स्फोट झाले आहेत. याआधी लेबनॉनमधून काही ड्रोन आकाशात दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सने पुष्टी केली आहे की, इस्त्रायली आयर्न डोम या ड्रोनला रोखण्यात अयशस्वी झाले. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये इस्त्रायली सैन्याच्या हेलिकॉप्टरजवळून एक ड्रोन जात असल्याचे दिसले.
🚨BREAKING: HEZBOLLAH DRONES STRIKE NETANYAHU'S PRIVATE RESIDENCE IN BOLD ASSAULT
— JAKE (@JakeGagain) October 19, 2024
Hezbollah UAV reportedly struck what’s believed to be Benjamin Netanyahu’s private home in Caesarea, according to Saudi TV channel " al-hadath."
netanyahu wasn’t present, and no injuries were… pic.twitter.com/dFjbLE0v0C
इमारतीला धडकले : इस्त्रायली मीडियानं सैन्याच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, तीनपैकी केवळ दोन ड्रोनला रोखण्यात आयर्न डोमला यश आलं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ड्रोन लेबनॉनपासून सुमारे 70 किलोमीटर उड्डाण केले आणि थेट सीझरियामधील एका इमारतीला धडकले. हा स्फोट खूप मोठा होता. स्फोटानंतर त्याची झळ अगदी लगतच्या इमारतीपर्यंत पोहोचली.
हेही वाचा - हमास म्होरक्याचा खात्मा; इस्रायली सैन्यानं 'मास्टरमाईंड' याह्या सिनवरला धाडलं यमसदनी