ETV Bharat / technology

रिलायन्स इंडस्ट्रीजची NVIDIA सोबत भागिदारी, पायाभूत AI सुविधा विकसित करणार

Reliance NVIDIA partnership : NVIDIA तसंच रिलायन्स इंडस्ट्रीजनं भारतातील पायाभूत AI सुविधा विकसित करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली.

Reliance NVIDIA partnership
जेन्सेन हुआंग, मुकेश अंबानी (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 24, 2024, 5:21 PM IST

हैदराबाद Reliance NVIDIA partnership : Nvidia नं भारतात AI पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या Nvidia च्या भारतातील पहिल्या-वहिल्या AI समिटमध्ये ही घोषणा करण्यात आली. एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना फायरसाइड चॅटसाठी आमंत्रित केलं. त्यांनी भारतातील Nvidia च्या AI योजनांबद्दल तसंच देशातील संगणक अभियंते, मोठ्या प्रमाणात डेटा आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक लोकसंख्येसह जागतिक AI शर्यतीत नेतृत्वाचा प्रमुख स्त्रोत बनण्याची भारताची क्षमता याबद्दल बोलले.

भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता : वास्तविक, Nvidia आणि रिलायन्स इंडस्ट्रीज मिळून भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पायाभूत सुविधा निर्माण करणार आहेत. Nvidia ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत ही अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.

भारतासाठी मोठी संधी : यावेली जेन्सेन हुआंग म्हणाले की, भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग संगणक अभियंत्यांचा आहे. अशा परिस्थितीत जर एआयची पायाभूत सुविधा भारतात तयार झाली तर ती भारतासाठी मोठी संधी असेल. अमेरिका आणि चीन व्यतिरिक्त भारतातही डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या मोठ्या पायाभूत सुविधा आहे. जर भारतात AI पायाभूत सुविधा तयार झाल्या, तर एका वर्षात भारताची संगणकीय क्षमता सुमारे 20 पटीनं वाढेल.

AI पायाभूत सुविधा निर्माण करणार : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, जिओने टेलिकॉम क्षेत्राच्या विकासात योगदान दिलं आहे. त्याचप्रमाणं Nvidia देखील चांगल्या दर्जाची AI पायाभूत सुविधा निर्माण करेल. रिलायन्स आणि Nvidia नं गेल्या वर्षी सांगितलं होतं की, ते भारतात सुपर कॉम्प्युटर बनवतील. आता दोन्ही कंपन्यांनी लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLM) तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे. गेल्या वर्षी, Nvidia नं LLM वर टाटा समूहासोबत भागीदारी देखील केली होती.

Nvidia सोबत भागिदारी : Nvidia ची संगणकीय प्रणाली जगातील सर्वोत्तम प्रणाली आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, Nvidia ची संगणकीय प्रणाली अतिशय उत्कृष्ट आहे. त्याची GB-200 प्रणाली आजपर्यंतचं सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. त्याच वेळी, Nvidia चे CEO म्हणाले की, भारत आता जगाला AI सेवा प्रदान करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Nvidia सोबतच्या भागीदारीनुसार Nvidia कॉम्प्युटिंग पॉवर प्रदान करेल. क्लाउड एआय इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी. रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओ पायाभूत सुविधांची देखभाल करेल. यासोबतच ग्राहकांच्या सहभागाची जबाबदारीही जिओकडे असेल. जेन्सेन हुआंग म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज जिओच्या ४५ कोटी ग्राहकांसाठी एआय ॲप्लिकेशन्स आणि सेवा तयार करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.