ETV Bharat / politics

राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करतो; संजय राऊत यांना तुम्ही फार मनावर घेऊ नका - नाना पटोले

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. तर महाविकास आघाडीच्या जागावाटप फॉर्म्युल्याबाबत नाना पटोले यांनी महिती दिली आहे.

Nana Patole on Sanjay Raut
संजय राऊत आणि नाना पटोले (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे पुणे दौऱ्यावर आहेत. बुधवारी महाविकास आघाडीनं ८५_८५_८५ जागांवर तिन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं असताना, आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही १०० च्या पुढे जागा लढवणार असल्याचं सांगितलं. याबाबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांना तुम्ही फार मनावर घेऊ नका.

जागावाटपाचा प्रश्न लवकरच सुटणार : जागावाटपाबाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, काही जागेवर चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे हे चद्रकांत पाटील यांना माहिती आहे. त्यांची सगळी चर्चा दिल्लीत होत आहे. आघाडी करत असताना एक एक जागेवर चर्चा करावी लागते. तसंच वाटाघाटीतूनच हे प्रश्न सुटत असतात. काही जागांवर चर्चा झाली असून थोड्या जागांचा प्रश्न हा लवकरच सुटणार आहे. बुधवारी आमच्या ८५-८५-८५ जागा झाल्या आहेत. तसंच बाकीच्या जागांवर चर्चा सुरू असून लवकरच प्रश्न सुटणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना नाना पटोले (ETV Bharat Reporter)

राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करतो : यावेळी नाना पटोले यांना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या यादीबाबत विचारलं असता ते म्हणाले, "उद्या संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षाची पहिली यादी ही जाहीर होणार आहे. त्याचबरोबर मला वाटतंय आता मुख्यमंत्री पदाची चर्चा नाही. राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मुख्यमंत्री पदाची चर्चा थांबवली पाहिजे. आत्ता अजून काहीच त्याबाबत ठरलं नाही".

हेही वाचा -

  1. शिवसेना सेंचुरी मारणार अन् त्यासाठी दोन षटकार ठोकणार; संजय राऊतांचा विश्वास
  2. तीन दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला ठाकरेंकडून तिकीट; महायुतीकडून कोणता उमेदवार?
  3. शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.