मुंबई - ऊर्फी जावेद हिनं सोशल मीडियावर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिनं तिची फोटो पोस्ट केली की त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होतो. ती जिथंही जाते तिथं ती चर्चेचा विषयी बनते. ती बनवत असलेले रील्स आणि करत असलेले फोटोशूट चाहत्यांसाठी आकर्षण असतं. ती अनेकदा सामाजिक विषयावर ठाम भूमिका घेऊनही वावरत असते. त्यामुळे काही जणांना पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या नात्यातली आहे का? असा प्रश्नही पडतो. एकदा हाच विषय ऊर्फीनं चक्क जावेद अख्तर यांनाही सांगितला होता, यावर ते हसल्याचं तिनं अलीकडच्या पोस्टमध्ये सांगितलंय.
ऊर्फी जावेदच्या लेटेस्ट फोटो पोस्टमध्ये ती सलीम जावेद यांच्यासह दिसत आहे. त्यांची भेट कधी आणि कशी झाली, भेटीत काय चर्चा झाली आणि आपल्याला त्यांच्या विषयी काय वाटते याबद्दल तिनं सविस्तर लिहिलंय.
ऊर्फी आपल्या पोस्टमध्ये लिहिते, "अलीकडे मला जावेद सरांचे वेड लागलंय. त्याची बौद्धिकता, विचार. काही गोष्टींच्या बाबतीत ते किती वेगळा विचार करतात आणि किती निर्भयपणे व्यक्त होतात ही गोष्ट मला खरोखरच मनोरंजक वाटते. त्यांच्याकडे असलेला ही गुणवत्ता माझ्याकडेही असावी, असं मला मनापासून वाटतं. मी प्राईम व्हिडिओवर सलीम जावेद हा शो पाहिला यामुळे मी वेडी झाली आहे. संपूर्णतः वेगळं व्यक्तीमत्व असलं तरीही ते इतके अद्वितीय आहेत.
वर्षभरापूर्वी माझी आणि जावेद सरांची विमानतळावर भेट झाली होती. त्यांनी मला ओळखलं आणि आपल्या शेजारी बसवून घेतलं. जावेद अख्तर हे काही लोकांना माझे आजोबा वाटतात, असा विनोद केला. मला वाटलं की, त्यांना माझं हे बोलणं आवडलं नसेल. पण तसं घडलं नाही त्यांना माझा विनोद कळला आणि ते हसले. त्यांनी माझ्याशी 20 मिनीटं गप्पा मारल्या. त्यांनी मला जेवायलाही ( पण ते घडू शकलं नाही ) बोलवलं. यामुळं मला माझ्या नतरेत थोडा आदर मिळाला. मी त्यांच्या घरी गेले तर उपस्थितीमुळे फरहान आणि झोया अख्तर यांना मी एक स्पर्धक वाटू शकेल, असं मी म्हणताच ते दिलखुलास हसले. क्वचितच अशी माणसे भेटतात जी खरोखर मनावर छाप सोडतात आणि आयुष्यातील सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडतात."