High Blood Pressure Diet: जगभरातील अब्जाहून अधिक लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. व्यस्त जीनवशैली, अयोग्य आहार पद्धत सोबतच कामाच ताण, यामुळे ही समस्या प्रचंड वाढते आहे. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. हल्ली तरुण वयातच उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. परंतु हा त्रास कमी करण्यासाठी आहारात काही बदल करणे गरजेचं आहे, असं प्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ यांनी सांगितलं.
डॉक्टर जानकी श्रीनाथ यांच्या मते, उच्च रक्तदाब जीवनशैली, जीन्स, अनुवांशिक कारण, वाढलेलं वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबी या कारणांमुळे होते. त्याचबरोबर चिंता आणि तणाव यामुळे देखील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजा ओळखा. आहारात पोषक घटकाबरोबरच व्यायाम देखील महत्त्वाचं आहे.
- आहाराची काळजी: डॉक्टरांच्या मते, सामान्य व्यक्तीनं निरोगी राहण्यासाठी दररोज एक चमचा मीठ घेतलं पाहिजे. याशिवाय कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी इतर खनिजे असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. उच्च रक्तदाबाची समस्या सोडवण्याकरिता आहारात चांगल्या फॅट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ई, सी, सेलेनियम आणि झिंक यांसारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असल्याचे समोर आलं आहे. फॉलिक ॲसिड आणि फायटोकेमिकल्स रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात असं म्हणतात.
- हे पदार्थ खा : काजू, हिरव्या पालेभाज्या, आलं-लसूण सोबतच दररोज किमान 30 ग्रॅम तेलबिया खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नियमित चार ते पाच चमच्यापेक्षा जास्त तेल वापरू नये. विशेषतः राईस, तीळ आणि मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसंच न शिजवलेले अन्न अधिक खाण्याचा सल्ला दिला जातो. सॅलड, मासे खाऊ शकता असं म्हटलं जाते की कॅल्शियममुळे उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. यामुळे आपण यावर लक्ष केंद्रित करा केलं पाहिजे.
- वजन कमी करा : ताणतणावांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच रोजचा व्यायाम आणि शरीराला पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. या सर्व सवयींचे पालन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेता येते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)