मुंबई : 2024 वर्ष संपायला फक्त दोन दिवस उरले आहेत. नवीन वर्ष 2025चं स्वागत करण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. 2024 हे वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीनं हिट वर्ष ठरलंय. चालू वर्षात हिंदी आणि साऊथमधील दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय चालू वर्षात, काही असे कलाकार आहेत, ज्यांनी खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर धमाल केली. 2024च्या टॉप 5 खलनायकांबद्दल जाणून घेऊया.
डेंजर लंका :नायक म्हणून बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला अभिनेता अर्जुन कपूरनं खलनायक बनून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. रोहित शेटच्या कॉप ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये, अर्जुन कपूरनं खलनायक डेंजर लंकाची भूमिका केली होती. या चित्रपटात अजय देवगण, टायगर श्रॉफ,अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. 'सिंघम अगेन' हा 2024च्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे 390 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
सरकटा :चालू वर्षाच्या 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या 'स्त्री 2' या हॉरर कॉमेडी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. श्रद्धा कपूर, राजकुमार आणि पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं होतं. याशिवाय प्रेक्षकांना घाबरवण्याचे काम 'सरकटा'नं केलं होत. या चित्रपटामध्ये खलनायकची भूमिका सुनील कुमार यांनी केली होती. सुनील कुमार यांनी यापूर्वी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय, मात्र त्यांना खरी ओळख 'स्त्री 2'मधून मिळाली. सुनील कुमार, अंदाजे 7 फूट उंच, पोलीस हवालदार आहेत. दरम्यान 'स्त्री 2' हा 2024 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.