मुंबई - दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या 'छावा' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली. 'छावा'नं भारतासह जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी कमाईचा जादुई आकडा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'छावा'नं दोन दिवसांत देशांतर्गत एकूण 67.5 कोटीची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं 31 कोटीची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी 'छावा'नं 36.5 कोटीचं कलेक्शन केलं आहे. 'छावा' हा चित्रपट विकी कौशलच्या अभिनय कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरेल अशी अपेक्षा आधीच होती. आता चित्रपटानं चांगली कमाई करून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे.
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 50 कोटीचा टप्पा ओलांडला. आता हा चित्रपट जगभरातही धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट 130 कोटीचं होतं. 'छावा' चित्रपट अनेकांना आवडत आहे. अनेकजण आता विक कौशलच्या अभिनयचं देखील कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील डायलॉग देखील अनेकांना जबरदस्त वाटत आहेत. दरम्यान 'छावा' हा विकीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील बनू शकतो.
'छावा' चित्रपटाबद्दल : 'छावा' हा 2025चा हिंदी भाषेतील ऐतिहासिक अॅक्शन चित्रपट आहे, जो मराठा साम्राज्याचे दुसरे शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांची भूमिका साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं केली आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचं रूपांतर आहे. 'छावा' 14 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटाला संगीत ए. आर. रहमान यांनी दिलं आहे.
हेही वाचा :