मुंबई - Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षीही फिट आणि अत्यंत सुंदर दिसते. 90 च्या दशकात माधुरीला फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर नृत्यासाठीही ओळखले जात होते. सध्या ती 'डान्स दीवाने' या शोमध्ये जज आहे. दरम्यान, धक धक गर्लचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये माधुरी तिच्या क्यूट फॅनबरोबर दिसत आहे, ज्यानं तिला सर्वांसमोर आंटी म्हटलं. त्यानंतर माधुरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदललेले. या व्हिडिओमुळे माधुरी चर्चेत आली आहे.
माधुरी दीक्षितच्या छोट्या चाहत्यानं म्हटलं आंटी : माधुरी दीक्षित 'डान्स दिवाने' शोसाठी तयार होऊन व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येत असताना, अचानक एक महिला एका मुलाला घेऊन तिच्याजवळ आली आणि म्हटलं, "माझ्या मुलाला तुला भेटायचे आहे." माधुरीनं मुलाला पाहिलं आणि हॅलो म्हटलं. या महिलेनं आपल्या मुलाला "से हॅलो टू आंटी" असं म्हणाला सांगितलं. यानंतर त्या लहान मुलानं सर्वांसमोर माधुरीला आंटी म्हटलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर माधुरी दीक्षित हसली. व्हायरल व्हिडिओमध्ये, माधुरी दीक्षित बहुरंगी लेहेंगा चोलीमध्ये दिसत आहे. यावर तिनं मोठ्या ड्रॉप इअरिंग्ज आणि बांगड्या घातल्या आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.