मुंबई - Baaghi 4 :अभिनेता टायगर श्रॉफनं त्याच्या अॅक्शन फ्रेंचाइजी 'बागी'च्या चौथ्या भागाच्याबातमीला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि वर्दा खान नाडियादवाला करत आहेत. 'बागी' आणि 'बागी 2' च्या यशाने टायगर श्रॉफचं चित्रपटसृष्टीत नाव झालं होतं. अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या या अॅक्शन फ्रँचायझीनं आतापर्यंत तीन चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज केले आहेत. टायगर श्रॉफ स्टारर 'बागी'चा चौथा भाग 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टायगरनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याचा 'बागी' ते 'बागी 3' या चित्रपटामधील ॲक्शन प्रवास दाखवण्यात आला आहे.
टायगर श्रॉफ 'बागी 4' येणार प्रेक्षकांच्या भेटीला : या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''माझ्या मनाच्या सर्वात जवळची फ्रेंचाइजी, सर्वात आव्हानात्मक देखील आहे.'' या व्हिडिओमध्ये तिन्ही चित्रपटांमधील टायगरचे बेस्ट सीन्स दाखविण्यात आले आहेत. व्हिडिओत टायगरनं फ्लाइंग किक, जंप आणि इतर स्टंट्ससह मार्शल आर्ट्स कौशल्य देखील प्रदर्शित केले आहे. या व्हिडिओमध्ये टायगरचे सिक्स पॅक आणि बायसेप्स दिसत आहेत. आता हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. 'बागी' चित्रपटाचे तिन्ही भाग चाहत्यांना खूप आवडले आहेत.