महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'चं शूटिंग कसं आणि कुठं झालं? 'दूरदृष्टी, चिकाटी आणि मेहनती'चं दर्शन घडवणारा 'पुष्पा 2' चा मेकिंग व्हिडिओ पाहा

'पुष्पा 2: द रुल' रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी, निर्मात्यांनी चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात दिग्दर्शकाची दूरदृष्टी, चिकाटी आणि मेहनत दिसली आहे.

Pushpa 2
'पुष्पा 2' (Pushpa 2 poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 3, 2024, 4:44 PM IST

मुंबई - 'पुष्पा 2: द रुल' हा यंदाचा सर्वात प्रतीक्षित चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी नवीन अपडेट्स जारी केले आहेत. आज 3 डिसेंबर रोजी, निर्मात्यांनी 'पुष्पा 2' च्या शूटिंगची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये पुष्पाची संपूर्ण टीम चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी किती कठोर परिश्रम करत आहे हे दिसून येतं.

रिलीजच्या 2 दिवस आधी निर्मात्यांनी 'पुष्पा 2' च्या शूटिंगचा एक न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्यासाठी सर्वात भव्य भारतीय चित्रपट बनवण्यासाठी खूप दूरदृष्टी, चिकाटी आणि मेहनत घेतली गेली आहे. 'पुष्पा 2: द रुल' ची वाइल्डफाय मेकिंग पहा.

व्हिडिओ एका शक्तिशाली टॅगसह सुरू होतो. व्हिडिओमध्ये दिग्दर्शक सुकुमार अल्लू अर्जुनला सीन समजावून सांगताना, त्याची स्टाईल, डायलॉग आणि बॉडिलँग्वेज याचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसत आहेत. श्रीवल्ली आणि भंवर सिंह शेखावत यांच्या शूटची झलकही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी टीमने किती मेहनत घेतली हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2'चं शूटिंग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी, विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशमध्ये झाले आहे.

काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चं नवीन गाणं 'पीलिंग्स' लाँच केलं होतं. 'किसिक'पेक्षा या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पा राज, रश्मिका मंदान्ना श्रीवल्ली आणि फहद भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलंगणामध्ये, 4 डिसेंबर रोजी विशेष शोसह थिएटरमध्ये हा चित्रपट दाखल होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details