महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जबरदस्त परफॉर्मन्सनंतर रिहाना मायदेशी रवाना, भारतात परतण्याची व्यक्त केली इच्छा - रिहाना

गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केल्यानंतर रिहाना मायदेशी परतली. परत जाण्यापूर्वी पॉप आयकॉनने सांगितले की तिला भारतात मिळालेलं प्रेम आवडलं आणि तिला पुन्हा एकदा परत यायची इच्छा आहे.

Rihanna Jets Back
रिहाना मायदेशी रवाना

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 3:33 PM IST

मुंबई- आंतरराष्ट्रीय ख्यातनाम पॉप गायिका रिहानाने गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. रिहानाने शुक्रवारी रात्री एक दमदार परफॉर्मन्स करून पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी तिने तिच्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले.

या भव्य इव्हेन्टमध्ये नेत्रदीपक सादरीकरण केल्यानंतर आपल्या मायदेशी परत जाताना रिहाना शनिवारी पहाटेच्या सुमारास जामनगर विमानतळावर दिसली. मीडियाशी तिच्या संक्षिप्त संभाषणादरम्यान, रिहानाने सांगितले की तिला येथे परफॉर्म करणे आवडले आणि येथे परत येण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा तिला करायची नाही. गुलाबी रंगाचा पोशाख केलेल्या रिहाना जामनगर विमानतळावरून बाहेर पडताना अतिशय सुंदर दिसत होती. इव्हेंटबद्दल विचारले असता, रिहाना म्हणाली की, "हे सर्वोत्कृष्ट होते, आता भारतात परत येण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही." तिच्या राहण्याबद्दल विचारले असता तिने "मला ते आवडले" असेही सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या प्री-वेडिंग पार्टीत रिहानाने स्टेजचा ताबा घेतल्याने जामनगर शहर मंत्रमुग्ध झाले. तिने आपल्या मनमोहक परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एरिक बूट्स ग्रीन, रिहानाचे ड्रमर, यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले, विशेषत: मंत्रमुग्ध करणारे ड्रोन प्रदर्शन तिला खूप आवडले. तिने यजमाना अंबानी कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिला मिळालेल्या उबदार स्वागताबद्दल ती पुढे म्हणाली, "आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि आम्ही आयुष्यात एक दिवस पुन्हा परत येऊ."

रिहाना गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या उत्सवात परफॉर्म करण्यासाठी पोहोचली होती. मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत या वर्षाच्या अखेरीस राधिका मर्चंटशी लग्न करत आहे. या उत्सवांमध्ये पारंपारिक भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. या कार्यक्रमास माजी पंतप्रधान, उद्योग जगतातील नेते आणि जगभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

अंबानी कुटुंबाचे जामनगरवर खूप प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी या भव्य सोहळ्याचं आयोजन याठिकाणी केले. याच शहरात मुकेश आणि त्याच्या वडिलांनी रिफायनरी बांधली आणि नीता अंबानी यांनीही जामनगर या वाळवंटासारख्या भागात हिरवीगार टाउनशिप बांधून आपल्या करियरची सुरुवात केली. गुजराती पंरपरांचे जत करण्याच्या हेतूने त्यांनी हा सोहळा जामनगरला आयोजित केला आहे.

हेही वाचा -

  1. शाहरुख आणि रणवीरची अनंत-राधिकांच्या प्री-वेडिंग पार्टीत ड्वेन ब्राव्होसह पोज
  2. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात पॉप क्वीन रिहानाचा नेत्रदीपक परफॉर्मन्स
  3. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंची हजेरी, वाचा कोण कोण उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details