मुंबई - Rakul Preet Singh-Jacky Bhagnani Wedding :अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा पार पडला. आता या जोडप्याच्या लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये जॅकी आणि रकुल एकमेकांबरोबर खूप आनंदी दिसत आहेत. 21 फेब्रुवारीला झालेलं हे लग्न आयटीसी ( ITC) साउथ गोवा येथे झालं असून या समारंभात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच पती-पत्नीच्या रुपात पापाराझींसमोर आले आहे. या जोडप्याचे पापाराझींनी अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत.
रकुल आणि जॅकी व्हिडिओ व्हायरल :व्हिडिओ बनवताना असताना जॅकीनं पॅप्सला म्हटलं की, ''आता तुम्ही हिला मॅडम म्हणणार नाही, यावर पापाराझी म्हटलं, बिलकुल नाही, आता रकुल आमची वहिनी आहे.' अखेर जॅकी की दुल्हनिया' म्हटल्यानंतर तिथेल अनेकजण हसू लागले. रकुलनं लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा निवडला होता, तर जॅकीनं ऑफ-व्हाइट शेरवानी घातली होती. लग्नाच्या पोशाखात हे जोडपे खूपच सुंदर दिसत आहे. रकुलनं तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यावर अनेकजण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
रकुल आणि जॅकीच्या लग्नात हे स्टार्स होते उपस्थित : रकुल आणि जॅकीचे लग्न आनंद कारज आणि सिंधी पद्धतीनं झाले आहे. दुपारी आनंद कारज झाला, तर साडेसातच्या सुमारास सिंधी सोहळ्याची सांगता झाली. ज्यामध्ये अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, शाहिद कपूर-मीरा राजपूत, वरुण धवन-नताशा, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रकुल आणि जॅकीनं 2020मध्ये एकमेकांना डेट करणे सुरू केले होते. त्यानंतर या जोडप्यानं 2021 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. रकुल आणि जॅकीसोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. दरम्यान जॅकीनं देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यावर त्यानं लिहिलं, ''माझी आता तू कायमची.'' या पोस्टवर देखील अनेकजण या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा :
- इमरान हाश्मी 'डॉन 3'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार का? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
- रश्मिका मंदान्नाने मिलान फॅशन वीक 2024 पूर्वी दाखवली तिच्या ग्लॅम ग्राइंडची झलक
- ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या सर्वांचे गुलजार यांनी मानले आभार