मुंबई - Aditya Narayan Viral Video :हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक उदित नारायण यांचा गायक आणि अभिनेता मुलगा आदित्य नारायण त्याच्या सार्वजनिक आक्षेपार्ह वर्तनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान आदित्य नारायणनं एका चाहत्याचा फोन हिसकावून पूर्ण ताकदीनं फेकला. यानंतर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड वेगान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये झालेल्या कॉन्सर्टमधील आदित्यचं कृत्य पाहून अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा आदित्य कॉन्सर्टमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या 'डॉन' चित्रपटातील गाणं गात होता.
आदित्य नारायण केलं गैरवर्तन :आदित्य नारायणचा हा कॉन्सर्ट खूप भव्य होता. या कॉन्सर्टमध्ये स्टेजच्या तिन्ही बाजूंनी वेढलेले चाहते होते. यावेळी अनेक चाहते आदित्यचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढत होते. यादरम्यान, आदित्यचं डोके फिरले आणि त्यानं फॅनच्या हातातून फोन जबरदस्तीनं हिसकावून दूरवर फेकला. या प्रकरणाबद्दल फक्त आदित्य नारायण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. या चाहत्यानं काही आक्षेपार्ह कमेंट केली असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. आता कॉन्सर्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक आदित्यला चुकीचं समजत आहेत.