मुंबई -The Family Star Box Office Collection Day 3 :विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या 'द फॅमिली स्टार' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करत होता. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. 'द फॅमिली स्टार' चित्रपटामधील विजय आणि मृणालची ऑन-स्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री ही अनेकांना आवडली आहे. या चित्रपटानं पहिले दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र आता तिसऱ्या दिवशी हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. 'फॅमिली स्टार' हा चित्रपट परशुराम पेटला यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे.
'द फॅमिली स्टार' बॉक्स ऑफिस कलेक्शन :हा चित्रपट हटके कहाणीमुळे चर्चेत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'द फॅमिली स्टार' चित्रपटानं 2 दिवसात 9 कोटींचा टप्पा पार केला आहे, मात्र वीकेंडला चित्रपटानं 2.99 कोटीची कमाई केली आहे. 'द फॅमिली स्टार' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.75 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 3.2 कोटीची कमाई केली होती. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर चित्रपट 'फॅमिली स्टार' मध्ये दिव्यांशा कौशिक, अजय घोष आणि वासुकी सारखे कलाकार देखील आहेत. 'द फॅमिली स्टार' हा दिग्दर्शक परशुरामचा विजय देवरकोंडाबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 एप्रिल रोजी अमेरिकेत रिलीज करण्यात आला होता.