मुंबई - Vicky Vidya ka woh wala video : अभिनेता राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर आगामी कॉमेडी चित्रपट 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं ट्रेलर खूपच मजेदार आहे. 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून मल्लिका शेरावत, विजय राज, मस्त अली यांसारखे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत. याशिवाय दलेर मेहंदीच्या गाण्यात अभिनेत्री शहनाज गिल स्पेशल अपीयरेंस करणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला विकी आणि विद्या स्वतःचा एक इंटिमेट व्हिडिओ बनतात.
'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ'चा ट्रेलर रिलीज :यानंतर त्यांचा सीडी प्लेयर चोरीला जातो. सीडी प्लेयर शोधण्याच्या धडपडीत विकी आणि विद्या पोलिसांची मदत घेतात. निर्मात्यांनी या ट्रेलरला एक सुंदर कॉमेडी जोडली आहे. या ट्रेलरमध्ये विजय राज हा मल्लिका शेरावतच्या प्रेमात पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजची घोषणा करतानाचा टीझर देखील पोस्ट केला होता. या मनोरंजक टीझरमध्ये, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी टीव्ही पत्रकारांच्या भूमिकेत दिसत होते. या टीझरमध्ये त्यांच्या चित्रपटातील कलाकार आणि क्रूची ओळख करून देण्यासाठी एक शो ते होस्ट करताना दिसले. हा रिलीज केलेला टीझर अनेकांना आवडला होता.