मुंबई - Bad Newz OTT Release: अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांचा कॉमेडी चित्रपट 'बॅड न्यूज'नं चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मोठ्या पडद्यावर आल्यापासून, चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहात होते. दरम्यान हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी यांचा 'बॅड न्यूज' एक दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवार 31 ऑगस्टपासून, ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आता प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. सध्या निर्मात्यांनी हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवर भाडेतत्त्वावर लॉन्च केला आहे. यासाठी आता प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहे.
'बॅड न्यूज' ओटीटी रिलीज :'बॅड न्यूज'चं बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामधील गाणीदेखील खूप हिट झाली आहेत. 'बॅड न्यूज' हा खूप कमी बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 64.51 कोटीची कमाई केली. या चित्रपटाचं जगभरातील एकूण कलेक्शन 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांनी धमाकेदार अभिनय केला आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि अमृतपाल सिंह बिंद्रा यांनी केली आहे.