मुंबई : बॉलिवूड स्टार रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या चर्चेत आहे. तिचा चित्रपट 'आझाद' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फार काही पसंत पडला नाही. राशानं या चित्रपटामधील 'उई अम्मा' या गाण्यावर उत्तम डान्स केला आहे. आता हे गाणं सध्या हिट झालं आहे. याशिवाय अनेकजण तिचे कौतुक देखील करत आहेत. सध्या राशाचा अभिनेत्री तमन्ना भाटियाबरोबर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता हा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तमन्ना आणि राशा व्यतिरिक्त विजय वर्मा आणि अभिषेक कपूर देखील असल्याचे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, राशा तमन्नाबरोबर काहीतरी बोलताना दिसतं आहे.
राशा थडानी आणि तमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राशा थडानी आणि तमन्ना भाटिया यांच्यामध्ये जेव्हा संवाद होतो, त्यावेळी बाहुबली गर्ल तिला म्हणते की, "मला आंटी बोल." यानंतर राशा ही हसायला लागते. तमन्ना पुन्हा म्हणते की, "मला आतापासून आंटी म्हणत जा." आता तमन्ना भाटिया आणि राशाच्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या दोघींवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
तमन्ना आणि राशानं केला डान्स : तमन्ना भाटिया आणि राशा यांनीही एक डान्स व्हिडिओ बनवला होता. त्याचा हा व्हिडिओ खूप मजेदार होता. तमन्ना आणि विजननं राशाबरोबर 'उई अम्मा' या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये तमन्ना आणि राशानं खूप सुंदर पद्धतीनं हावभाव दिले आहेत. याशिवाय व्हिडिओत विजय देखील आहे. हे तिघेही यात खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तिघेही कॅज्युअल लूकमध्ये आहेत. तमन्ना जीन्स आणि स्वेटशर्टमध्ये होती. तर राशानं पांढरी टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. विजय वर्मानं पांढऱ्या आणि ग्रे रंगसंगतीचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केला होता. यावर त्यानं काळा चष्मा घातला होता.
- आझाद चित्रपट : अभिषेक कपूर दिग्दर्शित 'आझाद' या चित्रपटातून राशा थडानीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण देखील दिसला आहे. याशिवाय अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा :