महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण धवननं 'चिन तपाक डम डम'नंतर 'स्त्री 2'मधील गाण्याचा टीझर केला शेअर - Varun Dhawans share video - VARUN DHAWANS SHARE VIDEO

Chin Tapak Dum Dum and shree 2 : 'चिन तपाक डम डम' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आहे. यावर वरुण धवननं एक रील तयार करून चाहत्यांबरोबर शेअर केला होता. हे रील चाहत्यांना खूप आवडत आहे. याशिवाय त्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर 'स्त्री 2'मधील गाण्याचा टीझर शेअर केला आहे.

Chin Tapak Dum Dum and shree 2
चिन तपाक डम डम आणि' स्त्री 2' (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 6:31 PM IST

मुंबई- Chin Tapak Dum Dum and shree 2 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चार शब्दांचा 'चिन तपाक डम डम' असा एक ऑडिओ व्हायरल होत आहे. यावर अनेक रिल्स आणि मीम्स बनवण्यात आले आहेत. हा डायलॉग लहान मुलांच्या प्रसिद्ध कार्टून शो 'छोटा भीम'मधून घेण्यात आला आहे. शोमधील हा डायलॉग टाकिया' नावाच्या खलनायकाशी संबंधित आहे. तो त्याच्या जादुई सामर्थ्याचं प्रदर्शन करताना अनेकवेळा 'चिन तपाक डम डम' हे शब्द वापरतो. आता सोशल मीडियावर 'चिन तपाक डम डम' हा डायलॉग खूप पसंत केला जात आहे. यावर आता काही चित्रपटसृष्टीतील कलाकर देखील रिल्स बनवत आहेत.

'चिन तपाक डम डम' डायलॉग :आता हे 'चिन तपाक डम डम' सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. अलीकडेच वरुण धवननेही या ऑडिओवर मुंबईमधील वातावरणाचा आनंद घेतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा डायलॉग बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यानं याआधी म्हटला होता. हा डायलॉग 'लडका लडकी' चित्रपटामधील दिवंगत गायक-अभिनेता किशोर कुमार म्हटला आहे. म्हणजेच किशोर कुमारच्या या चित्रपटातून 'चिन तपाक डम डम' या डायलॉगची कल्पना 'छोटा भीम'मध्ये घेतली गेली आहे. दरम्यान वरुण धवननं त्याचा हा मजेदार रील शेअर करताना यावर लिहिलं, "सुंदर वातावरण" त्याच्या व्हिडिओ अनेकजन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

वरुणनं शेअर केला 'स्त्री 2'मधील गाण्याचा टीझर :वरुण धवनच्या या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "वरुण तू खूप सुंदर दिसत आहे 'चिन तपाक डम डम" दुसऱ्या एकानं लिहिलं, "अरे वाह तुम्ही पण 'चिन तपाक डम डम' झाले." आणखी एकानं लिहिलं, "छोटा भीममधील 'चिन तपाक डम डम हा डायलॉग खूप छान आहे." याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. दरम्यान वरुण शेअर केलेला हा दोन दिवसापूर्वीचा रिल आता खूप व्हायरल होत असून अनेकण त्याची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान वरुण काही वेळापूर्वी 'स्त्री 2'मधील 'खूबसूरत' गाण्याचं टीझर शेअर केला आहे. यामध्ये तो श्रद्धा कपूरबरोबर रोमान्स करताना दिसत आहेत. आता असं मानलं जात की, 'मुंज्या'प्रमाणेच 'स्त्री 2'मध्येही 'भेडिया'चे काही कनेक्शन पाहायला मिळेल. 'स्त्री 2'मधील गाणं उद्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच वरुणच्या आगमी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'स्त्री 2', 'एक्कीस', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि 'बेबी जॉन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभू स्टारर 'सिटाडेल हनी बनी'च्या टीझर पोस्टरसह वेब सीरीजची रिलीज कधी? - CITADEL HONEY BUNNY
  2. 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवनचा चित्रपट देणार 3 चित्रपटांशी टक्कर - Baby John release date confirmed
  3. फोन हिसकावून पापाराझीच्या गर्लफ्रेंडशी वरुण धवननं मारल्या गप्पा, पाहा धमाल व्हायरल व्हिडिओ - Varun dhawan

ABOUT THE AUTHOR

...view details