मुंबई : ॲमेझॉन प्राईमचा क्राईम थ्रिलर 'पाताल लोक'चा सीझन 2ची प्रतीक्षा आता संपणार आहे. या सीरीजचा ट्रेलर आज 6 जानेवारी रोजी सोमवारी रिलीज झाला आहे. 'पाताल लोक सीझन 2'चा ट्रेलरमध्ये जयदीप अहलावत एक नवीन प्रकरण हाताळताना दिसत आहे. यावेळी या सीरीजची कहाणी नागालॅंडमधील प्रकरणावर आधारित असणार आहे. नागालॅंडमध्ये एका डेमोकॅटिक फोरमच्या संस्थापकाची हत्या होते. यानंतर दिल्लीत खळबळ सुरू होते. जयदीप अहलावत (हथिराम) हा या केसवर तपास करताना ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे.
'पाताल लोक' सीझन 2'चा ट्रेलर रिलीज : ट्रेलरच्या सुरुवातीला नागालॅंडमध्ये एका डेमोकॅटिक फोरमच्या संस्थापकाची हत्या होते, तेव्हा हे प्रकरण, दिल्ली पोलिसांकडे जाते. यानंतर हाथीराम या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नागालँडला पोहोचतो. सीझन 1 मधील हाथीरामचा विश्वासू मित्र, इम्रान अन्सारी, या सीझनमध्ये परत आला आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इम्रान आता उच्च दर्जाचा पोलीस अधिकारी बनला आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये पोलीस दलात नवीन सदस्य तिलोत्तमा शोमही सामील होताना दाखविण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये पुढं हाथीरामचे वैयक्तिक जीवन धोक्यात आहे, मात्र तरीही तो सत्याचा शोध सुरू ठेवताना दिसतो. दरम्यान पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हाथीरामला नवीन सीझनमध्ये धोकादायक गोष्टींना सामोरी जावं लागणार आहे.
'पाताल लोक सीझन 2' कधी होणार रिलीज : 'पाताल लोक'चा पहिल्या सीझन मे 2020 मध्ये प्रीमियर झाला होता, जो जयदीप अहलावतच्या चमकदार कामगिरीमुळे लोकप्रिय झाला होता. यानंतर अनेकजण दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत होते. अविनाश अरुण धावरे दिग्दर्शित आणि सुदीप शर्मा लिखित 'पाताल लोक सीझन 2' 17 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. आता हाथीराम आणि त्यांच्या टीमला पाहण्यासाठी सज्ज व्हा. हा शो अॅक्शन आणि गंभीर कहाणीसाठी प्रसिद्ध आहे. जयदीप अहलावत व्यतिरिक्त या सीझनमध्ये इश्वाक सिंग, तिलोत्तमा शोम आणि गुल पनाग सारखे नवीन कलाकार असणार आहेत.
हेही वाचा :