महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण धवननं कुटुंबाबरोबर शेअर केला 37वा वाढदिवस, फोटो व्हायरल... - varun dhawan - VARUN DHAWAN

Varun Dhawan Birthday : वरुण धवन आज 37वा वाढदिवस साजरा करत आहे. आता सोशल मीडियावर वरुणनं काही फोटो रिलीज केले आहेत.

Varun Dhawan Birthday
वरुण धवन वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 1:42 PM IST

मुंबई -Varun Dhawan Birthday : अभिनेता वरुण धवन आज 24 एप्रिलला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी त्याच्या कुटुंबासह चाहते आणि सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देत आहेत. आता वरुण धवननं त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो आपल्या कुटुबांबरोबर त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "मोठा होत शिकत आहे, तरीही तसाच राहण्याचा प्रयत्न करत आहे. अद्भुत शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. मी एक नवीन चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. त्यामुळे केकचा थोडासा भाग खाल्ला. आता मी याबद्दल खूप उसुक आहे."

वरुण धवननं आपल्या कुटुंबाबरोबर सेलिब्रेट केला वाढदिवस : वरुण धवननं त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो केकजवळ उभा राहून हसत आहे. या केकजवळ सुंदर मेणबत्ती आणि पुष्पगुच्छ ठेवला आहे. दुसऱ्या फोटोत तो त्याची आई करुणा धवनबरोबर दिसत आहे. तिसऱ्या फोटोत एक महिला एका छोट्यामुलीबरोबर बसलेली आहे. याशिवाय शेवटच्या फोटोमध्ये त्याची आई जेवणाच्या टेबलावर बसलेली दिसत आहे. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "वरुण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा." दुसऱ्या एकानं लिहिलं, "वरुणच्या आगामी चित्रपटाची मी वाट पाहात आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." याशिवाय आणखी एकानं लिहिलं, "तुझा दिवस खूप सुंदर जावो, वाढदिवसाच्या शुभेच्छा."

सेलिब्रिटीनी दिल्या शुभेच्छा : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं वरुण धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिच्या इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिस वर्ल्ड इव्हेंटमधील आहे, ज्यामध्ये मानुषी ही वरुणबरोबर शेकहॅन्ड करताना दिसत आहे. रकुल प्रीत सिंगनं वरुण धवनचा फोटो शेअर करत लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रा, तुझे वर्ष आनंदानं आणि यशानं भरलेलं जावो." कियारा अडवाणी आणि वरुण धवन 'जुग जुग जिओ' या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. कियारानं वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे 'जुग जुग जिओ'चे कपल कारमध्ये धमाल करताना दिसत आहे. कियारानं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हीडी... गाणं गात राहा, हसत राहा, जुग जुग जिओ मेरे दोस्त."

हेही वाचा :

  1. रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरण : व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी पाठवली नोटीस - Ranveer Singh Deep fake Video
  2. 'कुली'साठी रजनीकांतनं घेतलं 300 कोटींचं मानधन, ठरला आशियातील सर्वात महागडा स्टार? - Rajinikanth
  3. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील 'छावा' चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक लीक - Vicky Kaushal

ABOUT THE AUTHOR

...view details