मुंबई -Madhura Jasraj Death: शास्त्रीय गायक पंडित जसराज यांची पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्व व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज यांनी आज सकाळी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. याबद्दलची माहिती त्यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी दिली आहे. मधुरा यांचं वय 86 वर्षांचं होतं. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. मधुरा आणि जसराज यांना दुर्गा जसराज आणि शारंग देव अशी दोन मुले आहेत. दरम्यान कुटुंबाचे निकटचे स्नेही प्रीतम शर्मा यांनी मधुरा जसराज यांच्या शेवटच्या प्रवासाची माहिती देणारी एक माहिती शेअर केली आहे. मधुरा जसराज यांचं पार्थिव अंधेरीमधील वर्सोवा येथील घरी अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.
पंडित जसराज यांची पत्नी मधुरा यांचं निधन, वयाच्या 76व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शन करून रचला होता इतिहास - MADHURA JASRAJ PASSES AWAY - MADHURA JASRAJ PASSES AWAY
Madhura Jasraj Death: पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचं आज (25 सप्टेंबर) सकाळी निधन झालं आहे. मधुरा या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Sep 25, 2024, 11:45 AM IST
|Updated : Sep 25, 2024, 4:32 PM IST
मधुरा जसराज यांचं निधन : निवासस्थानातून दुपारी 3.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव नेले जाईल. मधुरा जसराज यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. लेखक, चित्रपट निर्माता आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून सक्रिय असलेल्या मधुरा यांनी 'संगीत मार्तंड पंडित जसराज' (2009) हा प्रसिद्ध माहितीपट बनवला होता. मधुरा यांचे भाऊ किरण शांताराम हे चित्रपट निर्माता आहेत. मधुरा यांनी वडील व्ही. शांताराम यांचे चरित्रदेखील लिहिलंय. याशिवाय त्यांच्या इतर अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मधुरा आणि पंडित जसराज यांचा विवाह 1962 मध्ये झाला. मुंबईत स्थायिक होण्यापूर्वी ते एक वर्ष कोलकाता येथे राहिले. एका मुलाखतीत पंडित जसराज यांनी सांगितलं होतं की, 6 मार्च 1954 रोजी एका कॉन्सर्टमध्ये ते मधुराला पहिल्यांदा भेटले होते. यावेळी मधुराचे वडील चित्रपट निर्माते व्ही शांताराम 'इनक इनक पायल बाजे' नावाचा चित्रपट बनवत होते." इथे पंडित जसराज यांनी मधुरा यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रुपांतरण झाले.
मधुरा जसराज यांच्याबद्दल :यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये पंडित जसराज यांचं वयाच्या 90 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पंडित जसराज हे शास्त्रीय गायक होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. जसराज आणि मधुरा पंडित यांची मुलगी दुर्गा जसराज संगीतकार आणि अभिनेत्री आहेत. याशिवाय त्याचा मुलगा शारंग देव संगीत दिग्दर्शक आहे. दरम्यान 2010 मध्ये, मधुरा यांनी पहिला मराठी चित्रपट, 'आई तुझा आशीर्वाद' दिग्दर्शित केला होता. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी 'आई तुझा आशीर्वाद'नं चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात वयस्कर आणि नवोदित दिग्दर्शक नोंद झाली. या चित्रपटात पंडित जसराज आणि दिवंगत लता मंगेशकर यांची मराठीतील गाणी होती.