महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिनेत्री नूर मालविका दासचा फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस चौकशी सुरू - Noor Malabika Das Dies - NOOR MALABIKA DAS DIES

Noor Malabika Das Dies : अभिनेत्री नूर मालविका दासचा सशयास्पद मृत्यू झाला आहे. लोखंडवाला येथील फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तिच्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Noor Malabika Das Dies
नूर मालविका दासचं निधन (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 2:39 PM IST

मुंबई - Noor Malabika Das Dies : काजोलबरोबर 'द ट्रायल' या वेबसीरीजमध्ये काम करणारी अभिनेत्री नूर मलाबिका दासनं कथित आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. 37 वर्षीय नूर ही यापूर्वी कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस होती. ही बातमी समोर येताच इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 6 जून रोजी लोखंडवाला येथील तिच्या फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. यानंतर शेजारी राहण्याऱ्या लोकांनी ओशिवरा पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

अभिनेत्री नूर मलाबिका दासनं केली आत्महत्या? : पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. यानंतर पोलिसांनी नूर मलाबिका दासच्या घराचा दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर पोलिसांना नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता औषधे आणि मोबाईल फोन आणि डायरी जप्त केली आहे. आता याप्रकरणी पोलीस खूप कसून चौकशी करत आहेत. नूरनं कथित आत्महत्या केल्याचं दिसत असले तरी नेमके यामागचं कारण काय होत हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला होता. पोस्टमॉर्टममध्ये ही हत्या की आत्महत्या हे अहवाल आल्यानंतरच कळेल. नूर मलाबिका दास ही डिप्रेशनमध्ये होती असं सांगितलं जात आहे.

नूर मलाबिका दासच्या चित्रपटांबद्दल : नूर मलाबिका दासच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणीही पुढे आलम नाही. यानंतर शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीनं पोलिसांनी रविवारी, 9 जून रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला. नूर मलाबिका दास ही आसामची होती. तिनं अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलंय. यात 'वॉकमन', 'तिखी चटणी', 'सिसियान', 'जघन्या उपया', 'देखी उंडेखी', 'बॅकरोड हस्टल' 'चार्मसुख' या चित्रपटांचा समावेश आहे. तिनं डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झालेल्या 'द ट्रायल' मध्ये काजोल आणि जिशु सेनगुप्ताबरोबर काम केलं होतं.

हेही वाचा :

  1. जम्मू काश्मीरमधील रियासी बस हल्ल्यात नऊ जणांच्या मृत्यूबद्दल बॉलिवूड सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त - REASI BUS ATTACK
  2. ओठांवर हसू, चेहऱ्यावर अभिमान, अनुष्का आणि रितिकानं साजरा केला भारताचा विजय - IND VS PAK T20 WORLD CUP 2024
  3. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले... - Narendra Modi PM Oath

ABOUT THE AUTHOR

...view details