मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभास आज 23 ऑक्टोबरला त्याचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं त्यानं चाहत्यांना एक अप्रतिम रिटर्न गिफ्ट दिलंय. प्रभासनं त्याच्या आगामी चित्रपट 'द राजा साब'चं मोशन पोस्टर रिलीज केलंय. अलीकडेच निर्मात्यांनी घोषणा केली होती की, ते प्रभासच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास आणणार आहेत. यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली. अखेर प्रभासनं चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे.'द राजा साब'च्या निर्मात्यांनी मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. यामध्ये प्रभासचा वेगळा आणि नवा अवतार पाहायला मिळत आहे.
प्रभासच्या 'द राजा साब'मधील पोस्टर आणि टीझर रिलीज :पोस्टरमध्ये प्रभास सिंहासनावर बसलेला दिसत आहे. त्याचा लूक त्याच्या आतापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. पोस्टर रिलीज करताना, निर्मात्यांनी लिहिलं की, ''रॉयल बाय ब्लड, रिबेल बाय चॉइस,तो घेतल्याशिवाय राहणार नाही, जे त्याचं नेहमी होतं.' 'द राजा साब' चित्रपटात प्रभास हा दुहेरी भूमिकेत असणार आहे. आता पोस्टरच्या पोस्टवर एका यूजरनं आपली प्रतिक्रिया देत लिहिलं, 'डबल रोल व्वा सुंदर गोष्ट आहे.' दुसऱ्या एकानं यावर लिहिलं, 'प्रभास आजोबा आणि नातवाच्या भूमिकेत आहे का?' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'काय दिसत आहे रेबेल स्टार ऑलवेज रॉक्स.'