महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच होईल सुरू - kapil sharma - KAPIL SHARMA

The Great Indian Kapil Show: कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या दमदार टीमबरोबर प्रेक्षकांना हसवण्यासाठी परतत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन 2 लवकरच प्रसारित होईल.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो (द ग्रेट इंडियन कपिल शो (Instagram( Sow Poster) Kapil Sharma))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 4:45 PM IST

मुंबई - The Great Indian Kapil Show: 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन 2सह परतण्यासाठी सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्मा लवकरच त्याच्या टीमबरोबर शोची शूटिंग सुरू करणार आहे. आता सर्वांना पुन्हा एकदा हसायला मिळणार आहे. कपिल शर्मा त्याच्या टीमबरोबर जबरदस्त कमबॅक करत आहे. रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा त्याच्या टीमसह मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या वेब सीरिजच्या स्टार कास्टबरोबर नवीन सीझनची शूटिंग सुरू करणार आहे. कपिल शर्माचा पहिला सीझन देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन चर्चेत :नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला पहिला सीझन लोकप्रिय झाल्यानंतर, आता अनेकांना दुसऱ्या सीझनबद्दल देखील खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी कपिलचा हा शो सोनी टीव्हीवर येत होता. आता या शोमध्ये काय नवीन घडते हे पाहणं खूप रंजक असेल. नकारात्मक प्रतिसादामुळे, शो नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आल्याची अफवा यापूर्वी पसरली होती. यानंतर टीमनं पुष्टी केली की शो फक्त 13 भागांसाठी ठेवण्यात आला होता. आता लवकरच नवीन सीझन लॉन्च होणार आहे. सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्माला सात वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे पहिला सीझन चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परतत असताना फ्लाइटमध्ये दोन्ही कलाकारांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर दोघांनी एकामेंकाबरोबर काम करण्याचं सोडलं होतं.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये यापूर्वी आलेले पाहूणे :'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, अर्चना पूरण सिंग आणि राजीव ठाकूर हे कलाकार आहेत. पहिल्या सीझनमध्ये सुपरस्टार आमिर खान, रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनी, कार्तिक आर्यन, दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यासह इतर अनेकजण पाहुणे म्हणून आले होते. आता कपिल कोणत्या पाहुण्यांबरोबर हा शो होस्ट करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज, रॅपर बादशाह करणार 'सनसनाटी' खुलासा - The great indian kapil show
  2. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो व्हायरल, सानिया मिर्झानं कपिल शर्माची उडवली खिल्ली... - sania mirza
  3. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सानिया मिर्झानं केला 'प्रेमाच्या शोधात' असल्याचा खुलासा - Sania Mirza

ABOUT THE AUTHOR

...view details