महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर गाठला 100 कोटींचा टप्पा, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई - THE GOAT LIFE - THE GOAT LIFE

THE GOAT LIFE BOX OFFICE : पृथ्वीराज सुकुमारन स्टारर सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट 'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या चित्रपटानं 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. दहाव्या दिवशीही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. विकेंडच्या दोन दिवसात आणखी कमाईची मोठी संधी आहे.

THE GOAT LIFE BOX OFFICE
'द गोट लाइफ' ग्लोबल बॉक्स ऑफिस

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 10:47 AM IST

मुंबई- THE GOAT LIFE BOX OFFICE : साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन याचा उत्कृष्ट अभिनय असलेला सर्व्हायव्हल ड्रामा फिल्म 'द गोट लाइफ'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. ब्लेसी दिग्दर्शित हा चित्रपट 28 मार्च रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींची कमाई केली. आज 6 एप्रिल रोजी रिलीजच्या 10 व्या दिवशी चित्रपट किती कमाई करणार आहे ते जाणून घेऊया.

चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.6 कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 7.75 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 8.7 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 5.4 कोटी रुपये कमावले होते. सहाव्या दिवशी 4.4 कोटी, सातव्या दिवशी 3.75 कोटी, आठव्या दिवशी 3.15 कोटी रुपये. चित्रपटाने नवव्या दिवशी 2.58 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 47 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे आणि जगभरातील कलेक्शन 100 कोटींच्या पुढे गेले आहे.

10व्या दिवशी चित्रपटाची कमाई

चित्रपटाने नवव्या दिवशी 2.58 कोटी आणि दहाव्या दिवशी 2 कोटी (अंदाजे) कमावले आहेत. चित्रपटाच्या एकूण देशांतर्गत कलेक्शनने 50 कोटींचा आकडा पार केला आहे आणि जगभरातील कलेक्शन 100 कोटींच्या पुढे गेले आहे.

विशेष म्हणजे 82 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या मूळ मल्याळम भाषेतील सर्व्हायव्हल ड्रामा चित्रपटानं त्याच्या खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटासाठी वास्तववादी भूमिकेत प्रवेश करण्यासाठी अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनला तीन दिवस उपाशी राहावे लागले होते. हा चित्रपट भारतीय स्थलांतरित कामगार नजीब मोहम्मदची सत्यकथा कथा आहे. कामाच्या शोधात सौदी अरेबियामध्ये गेलेला हा तरुण अडकला आणि त्याला आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याचा सामना करावा लागला.

हेही वाचा -

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका दिवसाच्या स्टंटचा खर्च होता 3-4 कोटी, दिग्दर्शकानं केला खुलासा - Bade Miyan Chote Miyan

'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च, निर्मात्यांनी चाहत्यांनी दिलं बर्थडे गिफ्ट - Srivalli first look

दिशा पटानीनं शेअर केले इटलीतील 'कल्की 2898 AD' च्या शूटिंगचे प्रभास बरोबरचे फोटो - Disha Patani Photo

ABOUT THE AUTHOR

...view details