मुंबई Independence Day 2024 Special :15 ऑगस्ट रोजी आपण खूप जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी देशभक्तीपर गाणी लावली जातात. हा दिवस देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे. दरम्यान अनेकजण स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट पाहून हा दिवस एंजॉय करतात. काही काल्पनिक कहाण्या देशभक्तीची भावना जागृत करण्यात मोलाचा वाटा उचलतात. जर तुम्हाला असाच काही कंटेंट घरी बसून पाहायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी देशभक्तीवर आधारित वेब सीरीजची यादी घेऊन आलो आहोत. यामधून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय पाहायचं आहे.
'द फॅमिली मॅन' : मनोज बाजपेयी स्टारर 'द फॅमिली मॅन' ही देशभक्तीवर आधारित सर्वोत्कृष्ट वेब सीरीजपैकी एक आहे. या वेब सीरीजचे 2 सीझन आहेत. दोन्ही सीझन खूपच अप्रतिम आहेत. मनोज बाजपेयी, प्रियामणी, शारिब हाश्मी, समांथा रुथ प्रभू यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेली ही वेब सीरीज तुमच्यातील देशभक्तीची भावना जागृत करण्यात यशस्वी ठरेल. 'द फॅमिली मॅन'चे दोन्ही सीझन 2019 आणि 2021 मध्ये रिलीज झाले होते. ही वेब सीरीज अॅमेजन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
'मुंबई डायरीज' : दहशतवादी हल्ल्यांबद्दल बोलताना आपण रुग्णालयांवर होणारे परिणाम मात्र विसरुन जातो. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांना अनेक कठिण परिस्थितींना सामोरं जावं लागलं होतं. 'मुंबई डायरीज' या वेब सीरीजमध्ये 26/11 घटनेबद्दल वास्तविकता दाखवली गेली आहे. मोहित रैना आणि कोंकणा सेन शर्मा अभिनीत ही वेब सीरीज दहशतवादी हल्ल्याचा सामना करताना रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर लोकांना वाचवण्यासाठी काय करतात, हे यात दाखवलं गेलं आहे. ही वेब सीरीज तुम्ही अॅमेजन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.