मुंबई - Taapsee Pannu Mathias Boe's Sangeet Night:हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोई यांनी 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये गुपचूप लग्न केलं. दरम्यान या जोडप्यानं अद्याप त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. आता सोशल मीडियावर या जोडप्याच्या म्युझिकल नाईटची एक झलक समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये लग्नामधील भव्यता दिसत आहे. तापसी पन्नू आणि मॅथियास बोईच्या लग्नाच्या आयोजकानं 1 मे रोजी इंस्टाग्रामवर या जोडप्याच्या म्युझिकल नाईटचा व्हिडिओ शेअर केला होता.
तापसी पन्नूच्या लग्नामधील व्हिडिओ व्हायरल :यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "तापसी आणि मॅथियास बोईची म्युझिकल नाईटची एक्सक्लूसिव स्टेप." या व्हिडिओमध्ये प्रवेशद्वारावर चमकणाऱ्या झुंबरांची झलक आणि लाइट्स दिसत आहेत. व्हिडिओची सुरुवात तापसी आणि मथियासच्या सुंदर फोटोनं होते. या जोडप्याचा हा फोटो बीचवर क्लिक केला गेला आहे. आता अनेकांना या लग्नामधील फोटो पाहण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया या व्हिडिओवर देत आहेत. एका मुलाखतीत तापसीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा तिनं लग्न झाल्याचं कबूल केलं होत. याशिवाय ती तिच्या लग्नामधील फोटो कधीपण शेअर करू शकते, असं तिनं सांगितलं होत.