मुंबई - रविवारी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 1994 मधील 'कभी हाँ कभी ना' या चित्रपटाला तीन दशक पूर्ण झाली. चित्रपट बनवल्याबद्दल दिग्दर्शक कुंदन शाह यांच्यासह संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे आभार मानण्यासाठी शाहरुखने त्याच्या X खात्यावर एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या कारकिर्दीतील 'कभी हाँ कभी ना' हा सर्वात गोड, प्रेमाची उब देणारा, आनंदी चित्रपट असल्याचे त्याने पोस्टमध्ये लिहिलंय.
शाहरुख खानने त्याच्या निर्मिती कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंटने X वर प्रसिद्ध केलेला एक छोटासा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला. "30 वर्षे उलटून गेली, तरीही 'कभी हाँ कभी ना' हा सदाबहार चित्रपट अत्यंत आवडला आणि आजही लक्षात ठेवला गेला आहे! आपण कोणत्याही काळात असलो तरी, हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहयला नेहमीच 'हाँ' असते."
पोस्ट शेअर करताना शाहरुखने लिहिले की, "माझा खरोखर विश्वास आहे की हा मी बनवलेला सर्वात गोड, उबदार आणि आनंदी चित्रपट आहे. मी तो पाहतो आणि चित्रपटातील प्रत्येकाला, विशेषत: माझे मित्र आणि शिक्षक कुंदन शाह मिस करतो. संपूर्ण कलाकार आणि क्रू, धन्यवाद आणि तुम्हा सर्वांवर प्रेम."