मुंबई - Sushant Singh Rajput Sister start Campaign : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं तिच्या भावाच्या मृत्यूनंतर अनेकदा न्यायासाठी मागणी केली आहे. आता अलीकडेच, श्वेतानं न्याय मागणीसाठी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. यामुळे ती सोशल मीडियावर आता चर्चेत आली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतनं जगातून कायमचा निरोप घेतला होता. मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. काही लोकांना अजूनही वाटते की सुशांतचा मृत्यू आत्महत्येनं झाला नाही. त्याच्या बहिणीनं पुन्हा एकदा सीबीआय अधिकाऱ्यांना सुशांतच्या मृत्यूबाबत शोध घेण्याची मागणी केली आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीनं न्यायसाठी केली ऑनलाइन मोहीम : सुशांत सिंहची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'न्यायफॉरएसएसआर जन आंदोलन' (Nyay4SSRJanAndolan) ची घोषणा केली आहे. या मोहिमेचा एक भाग होण्यासाठी, श्वेतानं प्रत्येकाला त्यांच्या मनगटावर किंवा कपाळावर लाल कापड बांधल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास सांगितलं आहे. श्वेतानं सीबीआयकडे तपासाला थोडा वेग देऊन सत्य उघड करण्याची मागणी केली आहे. तिनं इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करताना लिहिलं की, "जवळपास 45 दिवसानंतर सुशांतच्या मृत्यूला 4 वर्षे पूर्ण होतील. मी सीबीआयला या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करून सत्य उघड करण्यासाठीचे आवाहन करते. चला एकजुटीनं उभे राहून आपल्या मनगटावर आणि कपाळावर लाल कपडा बांधू आणि 'न्यायफॉरएसएसआर जन आंदोलन' टॅग करून मोहिमेचा भाग व्हा."