महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'आशिकी 2' फेम आदित्य रॉय कपूरची 'स्त्री'वर नजर, व्हिडिओ व्हायरल - Shraddha kapoor - SHRADDHA KAPOOR

Aditya roy kapur and Shraddha kapoor : 'आशिकी 2' फेम श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर एका कार्यक्रमादरम्यान भेटले. आता त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Aditya roy kapur and Shraddha kapoor
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर (श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 25, 2024, 12:21 PM IST

Updated : Sep 25, 2024, 2:00 PM IST

मुंबई - Aditya roy kapur and Shraddha kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या' स्त्री 2'च्या यशाचा आनंद घेत आहे. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर आता चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा आणि आदित्य एकमेकांना भेटताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी 2013 मध्ये 'आशिकी 2' या चित्रपटामधून आदित्य आणि श्रद्धाला चित्रपटसृष्टीत एक ओळख मिळाली होती. या चित्रपटामध्ये राहुल जैकर आणि आरोही यांच्यामधील प्रेम दाखविण्यात आलं होतं.

आदित्य आणि श्रद्धाची भेट :आदित्य आणि श्रद्धाच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम दिलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला, यानं बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. या चित्रपटात आदित्य हा राहुल जैकर आणि श्रद्धा आरोहीच्या भूमिकेत होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे दोघेही रातोरात प्रसिद्धीझोतात आले. यानंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे डेट करत असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. या दोघांनीही अनेकवेळा आपल्या प्रेमाची कबुली दिली, मात्र त्यांच नात फार काळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर अनेकवेळा ते इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. मात्र त्यांची भेट ही औपचारिक असायची. अनेकदा दोघेही एकमेकांना टाळताना आणि घाईघाईनं पुढे जाताना दिसले आहेत.

आदित्यची श्रद्धावर नजर :व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खूप वर्षानंतर आदित्य आणि श्रद्धा भेटल्यानंतर खुश असल्याचे दिसले. एका कार्यक्रमादरम्यान पुन्हा दोघेही एकत्र दिसले. यावेळी श्रद्धा पुढं उभी असल्याची दिसली. काळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. दुसरीकडे आदित्य हा काळ्या सूटमध्ये अतिशय स्टायलिश दिसत होता. आदित्यची श्रद्धावर नजर पडल्यावर त्याला तिच्यावरून नजर हटवता आली नाही. तो थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला. मग तिच्या जवळ जाऊन भेट घेतली. दोघांनाही एकत्र पाहून आता चाहत्यांना'आशिकी 2'मधील एका सीनची आठवण झाली आहे. या सीनमध्ये दोघे भेटतात तेव्हा पाऊस पडत असतो. चित्रपटातील हा एक रोमँटिक सीन होता. आता सोशल मीडियावर अनेकजण श्रद्धा आणि आदित्य या दोघांच्या जोडीचं कौतुक करताना दिसत आहेत. 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' नंतरही श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर 'ओके जानू'मध्ये एकत्र दिसले होते. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटामधील गाणी ही खूप हिट झाली होती.

हेही वाचा :

  1. 'स्त्री 2'नं रचला भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास, श्रद्धा कपूर स्टारर चित्रपटानं गाठला मोठा टप्पा... - STREE 2
  2. श्रद्धा कपूरनं वडील शक्ती कपूर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - Shakti Kapoor
  3. चंकी पांडेनं आदित्य रॉय कपूरबरोबर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी विचाराला 'हा' विशेष प्रश्न - Aditya roy kapoor and chunky pandey
Last Updated : Sep 25, 2024, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details