मुंबई Suniel Shetty : अभिनेता सुनील शेट्टी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहतो. कधी आपल्या लूकनं तर कधी तो आपल्या फिटनेसनं चाहत्यांची मनं जिंकत असतो. वयाच्या 62 व्या वर्षीही सुनील शेट्टी हा खूप फिट आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनंतर सुनील शेट्टी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ॲक्शन हिरोच्या रुपात परतणार आहे. त्यानं याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. याशिवाय त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना सुनीलनं त्याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. त्याचा हा लूक खूप दमदार आहे.
अॅक्शनमोडमध्ये दिसणार सुनील शेट्टी :सुनील शेट्टीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बर्फाळ टेकड्यांमध्ये पांढरा विंटर सूटमध्ये दिसत आहे. आजूबाजूला मोठमोठे पर्वत बर्फानं झाकलेले दिसतात. सुनील हा बर्फात बसलेला आणि काळा चष्मा घालून दिसत आहेत. या लूकमध्ये सुनील शेट्टी खूपच डॅशिंग दिसत आहे. आता वयाच्या 62 व्या वर्षीही त्याचा फिटनेस पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा फोटो शेअर करताना सुनील शेट्टीनं कॅप्शनमध्ये लिहिले, "लायन्सगेट इंडियाबरोबरच्या एका रोमांचक आगामी प्रोजेक्टमधील माझा पहिला लूक. 'अॅक्शन' मध्ये परत येण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही." आता सुनीलची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.