मुंबई Suhana Khan Italy :अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेमध्ये असते. झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ती इटलीमध्ये सुट्टींचा आनंद घेत आहे. आता सुहानानं तिथून काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टवर तिची बेस्ट फ्रेंड्स अनन्या पांडेनं एक कमेंट केली आहे. शनिवारी 20 एप्रिल रोजी शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाले आहेत. सुहानाचे हे फोटो पाहून अनेकजण तिच्या लुकबद्दल तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
सुहाना खाननं केले फोटो शेअर :सुहाना खाननं शेअर केलेल्या फोटोच्या पोस्टवर कॅप्शनमध्ये कॉपीच्या इमोजीसह 'सियाओ' असं लिहिलं आहे. तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. दरम्यान शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा सनग्लास लागला आहे. याशिवाय तिनं राखाडी टॉपवर काळ्या रंगाचं जॅकेट घातले आहे. यावर तिनं निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला आहे. या फोटोत ती खूप देखणी दिसत आहे. याशिवाय आणखी एका फोटोत तिनं पांढरे ठिपके असलेला काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा सेल्फी फोटो खूप आकर्षक आहे. तसेच तिनं काही आणखी काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.