मुंबई - Stree 2 Teaser : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्त्री 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर मंगळवारी सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 2018 च्या हिट स्त्रीचा सिक्वेल असून यामध्ये पहिल्या चित्रपटातील स्टार कास्ट तीच राहणार आहे. हा हॉरर-कॉमेडी 15 ऑगस्ट 2024 रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
'स्त्री 2' राजकुमार, श्रद्धा आणि पंकज त्रिपाठी यांना हॉरर कॉमिक विश्वात पुन्हा एकदा एकत्र करेल. ऑनलाइन टीझर रिलीजसाठी जाण्यापूर्वी, निर्मात्यांनी हॉरर-कॉमेडी फ्लिक मुंज्याच्या शोसह टीझर जोडला होता. मात्र, व्हिडीओ ऑनलाइन लीक झाल्याने ही योजना मागे पडली. आता, ऑनलाइन लीक झाल्यानंतर, निर्मात्यांनी प्रोडक्शन बॅनर मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत X हँडलवर टीझर शेअर केला आहे.
'स्त्री 2' च्या टीझरमध्ये दिसतं की, शहरात स्त्रीचा पुतळा उभारण्यात आलाय आणि त्याला दुधाने आंघोळ घातली जात आहे. पुतळ्याच्या नेम प्लेटवर 'ओ स्त्री रक्षा करना' अशी अक्षरं दिसतात. त्यानंतर या चित्रपटातील पात्र आश्चर्यचकित होऊन स्त्री खरोखरच परतल्याचं पाहतात. यामध्ये पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी आहेत. त्यानंतर शहरात स्त्रीची दहशत सुरू होते आणि श्रद्धा कपूरचा चेहरा दिसतो. त्यानंतर राजकुमार राव श्रद्धाच्या प्रेमात पागल झाल्याचं दिसत. 'ओ स्त्री रक्षा करना' ही शहरात भिंतीवर लिहिलेल्या घोषणा ब्रशनं पुसल्या जात असल्याचं दिसतं. त्यानंतर स्त्रीला पाहून घाबरलेला राजकुमार राव स्त्रीकडे वाचवण्याची केविलवाणी विनंती करताना दिसतो.
काही दिवसापूर्वी 'स्त्री 2'चा टीझर थिएटरमध्ये 'मुंज्या' चित्रपटाच्या दरम्यान दिसला होता. तोच टीझर आता रिलीज झाला असला तरी काही किरकोळ प्रसंग यात वाढवण्यात आले आहेत. या टीझरवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. क्वीन श्रद्धा परतल्याचे काही युजर्सनी म्हटलंय. हा टीझर चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असल्याचं संकेत देत असल्याचं एकानं लिहिलंय. 'हा चित्रपट सर्वांनाच आश्चर्यचकित करेल. हा चित्रपट 250 कोटी कमवणार असं वाटलं होतं पण मुंज्यानंतर स्त्री 400 पार करेल असंच वाटतंय. 25 कोटीनं ओपनिंग होईल आणि रविवारी 50 कोटीची कमाई होईल', असं एका युजरनं भाकित केलंय.
हेही वाचा -
- नाना पाटेकरनं 'वेलकम 3' नाकारला, केला मोठा खुलासा - NANA PATEKAR WELCOME 3
- 'पायरट्स ऑफ द कॅरिबियन' अभिनेता तामायो पेरीचा शार्क हल्ल्यात धक्कादायक मृत्यू - TAMAYO PERRY DIES
- 5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केल्यानंतर जयदीप अहलावत केलं चाहत्यांना प्रभावित - JAIDEEP AHLAWAT