मुंबई - Stree 2 Day 39 :'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' 15 ऑगस्टपासून थिएटरमध्ये राज्य करत आहे. 'जवान', 'पठाण' आणि 'बाहुबली 2'सह भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडल्यानंतर, 'स्त्री 2'नं 39वा दिवस बॉक्स ऑफिसवर पूर्ण केला आहे. आज 23 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीजच्या 40 व्या दिवसात आहे. दरम्यान 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात या चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली याबद्दल सांगण्यात आलं आहे.
'स्त्री 2'ची 39 दिवसांची कमाई : सॅकनिल्कनुसार 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर 39 व्या दिवशी 5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'स्त्री 2'चे निर्माते मडोक फिल्म्सच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाचं भारतात ग्रॉस कलेक्शन 713 कोटी रुपयांचं केलं आहे. याशिवाय नेट कलेक्शन एकूण 604.22 कोटी रुपयांचं आहे. यासह स्त्री 2नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 600 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ही मोठी कामगिरी करणारा 'स्त्री 2' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या यशाबद्दल 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांचं आभार मानलं आहेत.
सॅकनिल्कनुसार 'स्त्री 2' चं देशांतर्गत कलेक्शन
1 दिवस - 64.8 कोटी.
2 दिवस - 35.3कोटी.
3 दिवस - 45.7 कोटी.
4 दिवस - 58.2 कोटी.
5 दिवस - 35.8 कोटी.
6 दिवस - 26.8 कोटी.
7 दिवस - 20.4 कोटी.
8 दिवस - . 18.2 कोटी.
9 दिवस - 19.3 कोटी .
10 दिवस - 33.8 कोटी.
11 दिवस - 40.7 कोटी.
12 दिवस - 20.2 कोटी .
13 दिवस - 11.75 कोटी .
14 दिवस - 9.25 कोटी .
15 दिवस - 8.5 कोटी .
16 दिवस - 8.5 कोटी.
17 दिवस- 16.5 कोटी.
18 दिवस - 22 कोटी.
19 दिवस - 6.75 कोटी.
20 दिवस - 5.5 कोटी.