महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2' ठरला भारतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केली 'रेकॉर्डतोड' कामगिरी - Stree 2 - STREE 2

Stree 2 creates History: अवघ्या 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'स्त्री 2'नं 'जवान', 'पठाण', 'अ‍ॅनिमल', 'गदर 2', 'केजीएफ 2' आणि 'बाहुबली 2' या बिग बजेट चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर आता नवा इतिहास रचला आहे.

Stree 2 creates History
स्त्री 2नं रचला इतिहास (स्त्री 2 (Movie Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 18, 2024, 12:41 PM IST

मुंबई- Stree 2 creates History : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'नं इतिहास रचला आहे. 'स्त्री 2' हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. 17 सप्टेंबरपर्यंत या चित्रपटाला रिलीज होऊन 34 दिवस पूर्ण झाले. आज, 18 सप्टेंबर रोजी या चित्रपटानं 35 व्या दिवसात प्रवेश केला आहे. 'स्त्री 2'नं 34व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करून यशाचा झेंडा रोवला आहे. या चित्रपटानं 'जवान', 'पठाण', 'अ‍ॅनिमल', 'गदर 2', 'केजीएफ 2' आणि 'बाहुबली 2' यांना मागे टाकलं आहे. आता हा चित्रपट कमाईमध्ये नंबर वन बनला आहे. 'स्त्री 2' सर्वकालीन नंबर 1 हिंदी चित्रपट ठरल्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा दावा आहे. 'सॅकनिल्क'नुसार या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊया...

'स्त्री 2' चं देशांतर्गत कलेक्शन

1 दिवस - 64.8 कोटी.

2 दिवस - 35.3कोटी.

3 दिवस - 45.7 कोटी.

4 दिवस - 58.2 कोटी.

5 दिवस - 35.8 कोटी.

6 दिवस - 26.8 कोटी.

7 दिवस - 20.4 कोटी.

8 दिवस - . 18.2 कोटी.

9 दिवस - 19.3 कोटी .

10 दिवस - 33.8 कोटी.

11 दिवस - 40.7 कोटी.

12 दिवस - 20.2 कोटी .

13 दिवस - 11.75 कोटी .

14 दिवस - 9.25 कोटी .

15 दिवस - 8.5 कोटी .

16 दिवस - 8.5 कोटी.

17 दिवस- 16.5 कोटी.

18 दिवस - 22 कोटी.

19 दिवस - 6.75 कोटी.

20 दिवस - 5.5 कोटी.

21 दिवस - रु 5.6 कोटी.

22 दिवस - 5 कोटी.

23 दिवस - 4.5 कोटी.

24 दिवस - 8.5 कोटी .

25 दिवस - 11 कोटी .

26 दिवस - 3.60 कोटी.

27 दिवस - 3.1 कोटी.

28 दिवस- 3 कोटी.

29 दिवस - 2.75 कोटी.

30 दिवस- 3.35 कोटी.

31 दिवस- 5.4 कोटी.

32 दिवस- 6.75 कोटी.

33वा दिवस- 3 कोटी.

34 दिवस- 2.5 कोटी.

शनिवार आणि रविवारचं कलेक्शन

पहिला वीकेंड (चार दिवस) कलेक्शन – 194.6 कोटी

दुसरा वीकेंड (तीन दिवस) कलेक्शन – 93.8 कोटी

तिसरा वीकेंड (तीन दिवस) कलेक्शन – 45.75 कोटी

चौथा वीकेंड (तीन दिवस) कलेक्शन - 25.01 कोटी

बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'चा धमाका :या डोळे दीपवणाऱ्या आकड्यांसह'स्त्री 2'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. 'जवान'नं भारतातील सर्व भाषांमध्ये 640.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटानं हिंदी भाषेत 582.31 कोटी रुपये कमावले होते. 'जवान'चं जगभरातील कलेक्शन 1160 कोटी रुपये आहे. 'स्त्री 2'नं आता 583.30 कोटी रुपयांची कमाई केली असून 'जवान'च्या 583 कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. 34 व्या दिवशी 'स्त्री 2'चं देशांतर्गत एकूण कलेक्शन 668.75 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटानं परदेशात 130 कोटींची कमाई केली आहे. 'स्त्री 2' चित्रपटानं रिलीजच्या 34 व्या दिवशी 3.1 कोटीचा व्यवसाय केला आहे.

टॉप देशांतर्गत चित्रपटांचं कलेक्शन

1. स्त्री 2- 583.30 कोटी.

2. जवान - 583 कोटी.

3. अ‍ॅनिमल- 556 कोटी.

4. पठाण- 543.05 कोटी.

5. गदर 2- 525.7 कोटी.

6. बाहुबली 2- 510.99 कोटी.

7.केजीएफ- 2 - 434.70 कोटी.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' देशांतर्गत 500 कोटीच्या क्लबमध्ये सामील - 500cr club movie STREE 2
  2. 'स्त्री 2' तला 'सरकटा' फेम सुनील कुमार अली फजलबरोबर करतोय शूट, फोटो व्हायरल - sunil kumar
  3. श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2'नं 12 दिवसात जगभरात 500 कोटीची केली 'कमाई' - STREE 2close to 600 cr at worldwide

ABOUT THE AUTHOR

...view details