मुंबई - Sonu Sood and Swiggy Delivery Boy : देशाचा खरा हिरो अभिनेता सोनू सूदची स्तुती अनेकजण सोशल मीडियावर करताना दिसतात. त्यानं कोरोनाच्या काळात लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. या काळामध्ये त्यानं देशातील जनतेची खूप मदत केली होती. दरम्यान सोनू सूदबाबत एक बातमी समोर आली आहे. एक डिलिव्हरी बॉय घराबाहेर ठेवलेले शूज चोरतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता सोनून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यानं लिहिलं, "जर स्विगीच्या डिलिव्हरी बॉयनं डिलिव्हरीदरम्यान शूज चोरले तर त्याच्यावर कारवाई करू नका, त्याला एक जोडी शूज आणखी द्या, काही आवश्यकता असू शकते. दयाळू बना."
सोनू सूद झाला ट्रोल :आता युजर्सनी सोनूला एक्स पोस्टवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं की, "जर कोणी तुमची सोन्याची चेन चोरून पळून नेली तर, त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला नवीन सोन्याची चेन विकत घ्या. त्याला कदाचित खरोखर गरज असेल. दुसरा युजर्सनं लिहिलं, "जर एखादा अभिनेता महान बनण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला गांभीर्यानं घेऊ नका, कारण तो त्याच्या कौशल्यानं आपला व्यवसाय उभा करतो. आणखी एकानं लिहिलं, "सर तुमची विचारसरणी खूप चांगली आहे, पण यामुळे चोरीच्या घटना वाढतील." असे बरेच युजर्स आहेत जे सोनूची बाजू घेऊन बोलत असून त्याचे कौतुक करत आहेत.