मुंबई :बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या 'फतेह' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सोनूनं मुख्य भूमिका साकारली असून याचे दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सोनू फुल ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'फतेह' चित्रपटाच्या टीझरमध्ये खूप ॲक्शन पाहायला मिळत आहे. टीझरवरून कहाणीबद्दल जाणून घेणं अवघड असलं, तरी सोनू सूदचा हा चित्रपट सायबर गुन्ह्याविरोधात असणार असल्याचं दिसून येत आहे. आता हा टीझर सोनू सूदच्या अनेक चाहत्यांना आवडत आहेत.
कसा आहे टीझर? :'फतेह'च्या टीझरची सुरुवात सोनू सूदच्या डायलॉगनं होते. यात तो म्हणतो, "तुम्ही एकाला मारले तर, तुम्ही गुन्हेगार, हजार मारले तर तुम्ही राजा आहात, मी मोजत असलेली संख्या त्यापेक्षा जास्त होती." टीझरमध्ये ,सोनू अनेकांना मारताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये सोनू सूदबरोबर प्रमुख भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. टीझरमध्ये पुढं जॅकलिन विचारते, "फतेह तू करतो काय? " यावर सोनू सूद म्हणतो- "प्रत्येकाला माझ्याबद्दल माहित करून घ्यायचं आहे." या चित्रपटाची निर्मिती सोनाली सूद आणि सोनू सूद यांनी केली आहे. 'फतेह' हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटातून सोनू सूद लेखन आणि दिग्दर्शनात हात आजमावणार आहे. हा त्याचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे.