ETV Bharat / bharat

महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या नागा साधुंचा काय इतिहास आहे? जाणून घ्या, सविस्तर माहिती - MAHAKUMBH MELA 2025

हिमालयातून महाकुंभ मेळाव्यात येणाऱ्या नागा साधुंचा काय इतिहास आहे? त्यांच्याबाबत शंकराचार्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Mahakumbh  Mela 2025
नागा साधू कोण असतात (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

प्रयागराज: महाकुंभ मेळावा ( Mahakumbh Mela 2025) काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागा साधुंची देशभरात चर्चा होत आहे. या नागा साधुंनी परकीयांविरोधात लढाईत भाग घेतल्याचं बोललं जातं. या गुढ वाटणाऱ्या नागा साधुंविषयी जाणून घेऊ.

महाकुंभ २०२५ हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा १५ किलोमीटरच्या परिघात सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यात येणारे नागा साधू कोण असतात? त्यांना धर्मरक्षक का म्हटलं जाते? याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "नागा हा शब्द नागपासून आला आहे. नाग म्हणजे पर्वत. जे हलत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहता त्याला नाग म्हणतात. हे नागा साधू बलवान आणि शक्तीचे प्रतीक आहेत. जो कधीही हालचाल करत नाही. नागा म्हणजे कधीही डगमगत नाही. अशा विचारसणीच्या साधुंना नागा साधू म्हटलं जाते".

नागा साधू कोण असतात (Source- ETV Bharat)

नागा साधू नग्न का राहतात? जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्वकाही गोष्टींचा त्याग करतो. त्यामुळे तो पूर्णपणे नग्न होऊन उत्तरेकडे हिमालयाकडे निघतो. यावेळी गुरू त्याला थांबवून कमरेला वस्त्र देतात. ज्ञानप्राप्ती ध्यान करण्यासाठी आज्ञा देतात. गुरु थांबवित असल्यानं संन्यासी थांबतात. अन्यथा, त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे नग्न होऊन हिमालयात जायचे असते. जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात. त्यांना दिगंबर असेही म्हणतात. सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात. ते कधीही कपडे घालत नाहीत.

नागांचा काय इतिहास आहे? प्राचीन काळात अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले. त्यांचा पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचार केले. त्या आक्रमकांना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले. त्यांनी परकीयांविरोधात अनेक लढाया लढल्या आहेत. नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढला. त्यांना शूर पुरुष, धर्मरक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जाते.

शास्त्राबरोबर शस्त्राची आहे परंपरा-नागा साधुंनी धर्म आणि समाजासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. नागा साधू हे जगतगुरू आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्यांच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात तरबेज आहेत. प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ, भाला, तलवार, कुऱ्हाड आणि खुकरी वापरत असत. आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. गेल्या २,५०० वर्षांपासून दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी ही परंपरा पाळत आहेत. ते आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करतात. आदिगुरु शंकराचार्यांनी राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी शास्त्रे आणि शस्त्रांची परंपरा स्थापित केली होती.

हेही वाचा-

  1. बॉलिवूडमधून महाकुंभ 2025 मेळ्यात कोण जाणार, घ्या जाणून...
  2. महाकुंभ 2025 : 400 टन कचऱ्यापासून मंदिराची रचना; संगम स्नानासह 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन, बोट चालवून भारताला घाला प्रदक्षिणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.