मुंबई : बॉलिवूड स्टार हृतिक रोशन 10 जानेवारी रोजी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिक रोशन हा देखणा अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एक उत्तम अभिनेता असून सुंदर डान्सर आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून केली होती. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हृतिकचा 'कहो ना प्यार है' चित्रपट हिट झाल्यानंतर त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. हृतिकनं त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चांगले चित्रपट दिले आहेत. यातील अनेक चित्रपटांमध्ये हृतिकनं अशा काही चांगल्या भूमिका केल्या आहेत, ज्या अजूनही लोकांना खूप आवडतात. हृतिकचा 'क्रिश' चित्रपट खूप गाजला होता. तो भारताचा पहिला सुपरहिरो होता. आज आम्ही या विशेष दिवशी त्याच्या 5 धमाकेदार भूमिकांबद्दल सांगणार आहोत.
1 . कोई... मिल गया : 2003मध्ये आलेल्या 'कोई...मिल गया' या चित्रपटात हृतिकनं मानसिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आणि जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलाची भूमिका केली होती. यानंतर एका अनोख्या मित्राला (एलियन) भेटल्यानंतर तो बरा होतो. हृतिकनं ज्या पद्धतीनं हे पात्र साकारलं होतं, ते आजही पसंत केले जाते.
2. जोधा अकबर : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'जोधा अकबर' या ऐतिहासिक चित्रपटात हृतिकनं मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारली होती. यात जोधाची भूमिका ऐश्वर्या रायनं साकारणारी होती. हृतिकनं हे पात्र खूप लोकप्रिय झालं होतं. त्याच्या चाहत्यांना या चित्रपटामधील त्याचा लूक खूप आवडला होता. 'जोधा अकबर' चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली होती.
3. क्रिश : राकेश रोशनच्या 'क्रिश'ची, कहाणी 'कोई... मिल गया'पासून पुढे जाते. या चित्रपटात हृतिकचे पात्र खूपच वेगळे दाखविण्यात आले आहे. 'क्रिश' चित्रपटात, हृतिकनं एका सुपरहिरोची भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. हृतिकचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप गाजला होता. 'क्रिश'मध्ये तो त्याच्या शक्तींचा वापर लोकांचे कल्याण करत असतो. यानंतर, हृतिकनं 'क्रिश 3'मध्येही सुपरहिरोची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे हृतिकला भारताचा पहिला सुपरहिरो होण्याचा मान मिळाला.
4. लक्ष्य : हृतिक रोशन स्टारर 'लक्ष्य' या चित्रपटामध्ये त्यानं एका मुलाची भूमिका साकारली आहे, जो खूप बालिश आणि बेजबाबदार असतो. मात्र जेव्हा तो सैन्यात भरती होतो, यानंतर त्याच्यात पूर्णपणे बदल होतो. तो युद्धभूमीवर लीडर बनतो. हृतिकचा हा चित्रपट अनेकांना खूप पसंत पडला होता. विशेषतः त्याच्या गणवेशातील लूकचे खूप कौतुक झाले होते. 'लक्ष्य' 2004 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहान अख्तरनं केलं होतं.
5. 'धूम 2' : हृतिक रोशननं 'धूम 2' मध्ये, एका चोराची भूमिका साकराली होती. या चित्रपटात तो एकामागून एक मौल्यवान वस्तू चोरत असतो. त्याच्या मागे पोलीस लागलेली असते. मात्र तो त्याच्या हातात येत नाही. या चित्रपटामध्ये हृतिक चोरीसाठी अनेक प्रकारचे रुप बदलवत असतो. या चित्रपटासाठी हृतिकचं खूप कौतुक झाले आहेत. 'धूम 2' चित्रपटात त्याच्याबरोबर ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू, उदय चोप्रा यांसारख्या कलाकार दिसले होते.
हेही वाचा :
- "तुम्ही मला जबाबदार बनवलं" म्हणत हृतिक रोशननं मीडियासमोर उलगडली 25 वर्षांची कारकिर्द, वाचा तो काय म्हणाला
- 'खांद्यावर हात आणि डोळ्यात प्रेम', गर्लफ्रेंड सबाबरोबर सुट्टीचा आनंद घेऊन आल्यानंतर हृतिक रोशन मुंबई विमातळावर झाला स्पॉट
- 'द रोशन्स' डॉक्युमेण्ट सिरीज रिलीजसाठी सज्ज, हृतिक, राकेश आणि राजेश रोशन यांची कारकिर्द उलगडणार