मुंबई : 'गेम चेंजर' चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. राम चरण स्टारर 'गेम चेंजर' राजकीय अॅक्शन ड्रामा असून या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. राम चरणचा दिग्दर्शक एस. शंकरबरोबरचा पहिल्याच चित्रपट आहे. एस. शंकर यांचा शेवटचा चित्रपट 'इंडियन 2' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. एस. शंकर यांनी 'गेम चेंजर' चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
'गेम चेंजर'ची किती विकली गेली तिकिट : सॅकनिल्कच्या मते, राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर 'गेम चेंजर' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 43.55 कोटी रुपयांची कमाई करेल. या चित्रपटाच्या तेलुगू 2डी आवृत्तीनं 726130 तिकिटे विकली, तर तमिळ 2डी आवृत्तीनं 48884 तिकिटे विकली. हिंदी 2डी 1,43,146 तिकिटे विकली गेली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 26-30 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. अहवालांनुसार, 'गेम चेंजर'नं शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत भारतात सर्व भाषांमध्ये 12.75 कोटी रुपये कमावले आहेत.
BREAKING: Game Changer advance ZOOMS past ₹6⃣5⃣ cr at the WW Box Office.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 9, 2025
'गेम चेंजर'ची किती होईल कमाई : दुसरीकडे, चित्रपट उद्योगाचे ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी दावा केला आहे की, राम चरणचा 'गेम चेंजर' जगभरात 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करेल. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं, 'गेम चेंजर'ची आगाऊ कमाई जगभरातील बॉक्स ऑफिसवर 65 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.' दुसरीकडे 'व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, 'गेम चेंजर'ला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळेल. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 70 कोटी रुपयांची कमाई करू शकतो असं त्याचं मत आहे. 'गेम चेंजर' संक्रांतीच्या हंगामात तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर ठरेल. या चित्रपटामध्ये राम चरण आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त सूर्या, अंजली, एसजे, वेनेला किशोर आणि श्रीकांत यांसारखे कलाकार आहेत.
हेही वाचा :