मुंबई- सोनाक्षी सिन्हानं तिच्या अलिकडेच साजरा केलेल्या वाढदिवसाच्या फोटोंची मालिका सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिनं चाहत्यांचे आणि प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. २ जून रोजी सोनाक्षीनं तिचा वाढदिवस साजरा केला. यासाठी तिला सेलिब्रिटी, मित्र, कुटुंब आणि चाहत्यांकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळालं. हा दिवस तिच्यासाठी का खास होता याचा खुलासाही तिनं केला आहे.
सोनाक्षीनं सेटवर हजर राहून घेतला सुट्टीचा आनंद
फोटोंची मालिका शेअर करताना सोनाक्षीनं लिहिलं की, "मी सहसा माझ्या वाढदिवसाला कामावरून सुट्टी घेते आणि कुठेतरी जाते. पण 7 वर्षांनंतर मी सेटवर परतले आहे आणि मला आठवलं की आपल्याला जे आवडतं ते काम करण्यात सुट्टीचा वेळ घालवावा. त्यामुळे सेटवर माझा वेळ आनंदात गेला. माझ्या टीमनं हा दिवस माझ्यासाठी खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी मला ऑनलाइन शुभेच्छा पाठवल्या त्या प्रत्येकाचं आभार... तुमचे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. जरी मी तुमच्या शुभेच्छा पुन्हा पोस्ट केल्या नसल्या तरी वाढदिवसाच्या दिवशी मी कामावर होते हे तुम्ही पाहू शकता.
सोनाक्षी सिन्हाचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालनं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तां सुंदर पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. इन्स्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाबरोबरचे स्वतःचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.