बीड kho-Kho World Cup 2025 : पहिल्यांदाच आयोजित झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडली. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारतीय महिला खो-खो संघानं 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला. हीच लय संघानं कायम ठेवत संघानं अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करत विश्वविजय मिळवला.
India won & showed the world how it’s done. Definitely a victory for the books! 🎉🇮🇳🔥#TheWorldGoesKho #KhoKhoWorldCup #KKWC2025 pic.twitter.com/3CHEJqjP4D
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 19, 2025
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा : भारतीय महिला संघाच्या कामगिरीत संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रियंका ही बीडची असून तिच्या या विक्रमामुळं बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोबतच बीडला जागतिक पातळीवर तीनं ओळख मिळवून दिली आहे. या खो-खो सामन्याच्या वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते. प्रियंकाच्या या कामगिरीमुळं राज्यातूनच नव्हे तर देशातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिचे आई-वडील हनुमान इंगळे व सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकाकडून व मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. प्रियंकाच्या आई आणि वडीलांनी देखील तिच्या या यशानंतर मुलीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.
कसा झाला अतिंम सामना : भारतीय महिला खो-खो संघानं पहिल्याच टर्नवर आक्रमण केलं आणि नेपाळचे बचावपटू त्यांच्यासमोर असहाय्य होते, त्यानंतर भारतानं सुरुवातीला 34-0 अशी आघाडी घेतली आणि तिथून त्यांनी सामन्यावर नियंत्रण मिळवलं. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं नेपाळला एकही संधी दिली नाही. दुसऱ्या टर्नवर, जेव्हा नेपाळची आक्रमणाची पाळी होती, तेव्हा त्यांना आघाडी मिळवण्यात अपयश आलं. अंतर कमी करण्यात यश आलं. दुसऱ्या टर्ननंतर स्कोअर 35-24 होता. तिसऱ्या फेरीत भारतानं आणखी 38 गुण मिळवले. 49 गुणांच्या मोठ्या आघाडीवर नेपाळकडं कोणतंही उत्तर नव्हतं. जणू काही नेपाळ संघानं भारतीय खेळाडूंसमोर शरणागती पत्करली असं वाटत होतं. यानंतर, जेव्हा नेपाळ संघानं शेवटच्या टर्नवर आक्रमण केलं तेव्हा त्यांना फक्त 16 गुण मिळवता आले आणि शेवटी भारतीय संघानं नेपाळला 78-40 च्या मोठ्या फरकानं हरवलं.
👸 𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐦𝐚𝐝𝐞 🇮🇳🏆
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 19, 2025
Congratulations to #TeamIndia women for claiming the 𝐟𝐢𝐫𝐬𝐭-𝐞𝐯𝐞𝐫 𝐊𝐡𝐨 𝐊𝐡𝐨 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐮𝐩 👏#KhoKhoWorldCup #KKWC2025 #TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho #KKWCWomen pic.twitter.com/tqlBPbTIdc
हेही वाचा :