मुंबई -पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझनं आपल्या आवाजनं अनेकांच्या मनावर जादू केली आहे. आज त्यानं आपल्या गायकीनं जगभरात नाव कमावलं आहे. दिलजीतचा कॉन्सर्ट देशभरात असो या कुठल्याही परदेशात, त्याचा क्रेझ चाहत्यांमध्ये खूप आहे. दिलजीतच्या शोच्या तिकिट खूप कमी वेळात विकल्या जाते. अनेकांना तर त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिट देखील मिळत नाही. एका छोट्या गावातून येऊन देश-विदेशात नाव कमावणारा दिलजीत आज संपूर्ण पंजाबची ओळख बनला आहे. त्याचे गाणी इतकी जास्त लोकप्रिय आहे, की कोणीही सहज आपल्या प्ले लिस्टमध्ये त्याचे गाणी ठेवतो. आज दिलजीत 6 जानेवारी रोजी आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे.
दिलजीत दोसांझबद्दल वैयक्तिक माहिती :दिलजीत दोसांझनंचा जन्म 6 जानेवारी 1984 रोजी पंजाबमधील दुसांझ कलान या छोट्याशा गावात झाला होता. दिलजीतनं लहानपणापासूनच गायन सुरू केले होते. गुरुद्वारांमध्ये तो गायन करत होता. त्यानंतर त्यानं त्याचा पहिला अल्बम 'इश्क दा उडा अदा'मधून संगीत क्षेत्रात प्रवेश केला. पंजाबी इंडस्ट्रीबरोबर त्यानं बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला. त्यानं गायनबरोब अनेक हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. याशिवाय तो हिट गाणी देऊन आता तरुणांच्या मनावर राज्य करत आहे.