मुंबई: गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केल्यानंतर, आदर जैन आणि अलेखा आडवाणी आता हिंदू पद्धतीनं लग्न करणार आहेत. मुंबईत या जोडप्याचा लग्न समारंभ सुरू झाला आहे. दरम्यान बुधवार 19 फेब्रुवारी रोजी कपूर कुटुंब आणि चित्रपट उद्योगातील लोक या जोडप्याच्या मेहंदी समारंभात उपस्थित होते. आता या मेहंदी समारंभातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी झालेल्या मेहंदी समारंभात आदरची कजिन -अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनीही हजेरी लावली. या दोघीही या कार्यक्रमामध्ये पारंपारिक पोशाखात दिसल्या.
आदर जैन आणि अलेखा अडवाणी यांची मेंहदी : याशिवाय आदर जैन आणि अलेखा अडवाणी यांच्या मेहंदी समारंभात स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टायलिश अंदाजात दिसले. आलियाची आई सोनी राजदान देखील मुली आणि जावयासह समारंभात पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसली. या कार्यक्रमात रणबीरनं पांढऱी शेरवानी आणि मॅचिंग चुडीदार पँट परिधान केला होता. यामध्ये तो खूप देखणा दिसत होता. दुसरीकडे, आलियानं पिवळ्या रंगाचा शरारा घातला होता. यात ती खूप खास दिसत होती. तसेच नीतू कपूर तिची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीसह आदर आणि अलेखाच्या मेहंदी समारंभात उपस्थित होत्या. पापाराझींनी आई आणि मुलीला एकत्र कॅमेऱ्यात कैद केलं.
Kareena at Aadar Jain Mehendi Event
— Kareena Kapoor Khan FC (@KareenaK_FC) February 19, 2025
Video credit: Mahesh_videojournalist insta pic.twitter.com/VrTwAIJhom
आदर आणि अलेखा मेंहदी समारंभात लावली 'या' स्टार्सनं हजेरी : रंगबेरी रंगाच्या लेहेंग्यात रिद्धिमा खूपच सुंदर दिसत होती. तसेच नीतू कपूरनं काळ्या आणि हिरव्या रंगसंगतीचा सूट परिधान केला होता. कपूर कुटुंबातील इतर सदस्यही या जोडप्याच्या मेहंदी समारंभात उपस्थित होते. मेहंदी समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन देखील दिसल्या. जानेवारीच्या सुरुवातीला आदर आणि अलेखा यांनी गोव्यात मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला. या जोडप्याचा रोका समारंभ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. या कार्यक्रमाला करिश्मा कपूर, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांच्यासह अनेक बी-टाउन सेलिब्रिटी उपस्थित होते.