मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे काही चित्रपट निर्मित केले गेले आहेत, जे मनाला भिडणारे आहेत. काही प्रेक्षकांना भावनिक चित्रपट खूप पाहायला आवडतात. आज आम्ही तुमच्यासाठी चित्रपटांची यादी घेऊन आलो. हे चित्रपट पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल. आता आम्ही तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीतील असे 5 चित्रपट सुचवत आहेत, जे तुम्ही पाहायला पाहिजे.
1 'माहेरची साडी' : विजय कोंडके दिग्दर्शित 'माहेरची साडी' हा चित्रपट खूप जास्त भावनिक आहे. या चित्रपटात लक्ष्मी, जिची आई बाळंतपणादरम्यान मरण पावते, यानंतर तिला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते, कारण लक्ष्मीचे वडील तिला वाईट मानतात. तसेच ते त्याच्या पत्नीच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार मानतात. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 12 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट 1991मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी किशोरी शहाणे आणि इतर कलाकार दिसले आहेत.
2' काकस्पर्श': 'काकस्पर्श' या चित्रपटात उमा लहानपणीच तिच्या पतीला दुःखदपणे गमावते. ती लहान वयात विधवा झाल्यानंतर तिला खूप दु:ख सहन करावं लागते यावर ही कहाणी आधारित आहे. हा चित्रपट 4 मे 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रिया बापट, वैभव मांगले, सई मांजरेकर, सचिन खेडेकर,मेधा मांजरेकर, अभिजित केळकर, गौरी इंगवले आणि इतर कलाकार दिसले आहेत. 'काकस्पर्श' चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाचे निर्माते मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे आहेत.
3 'श्वास': 'श्वास' हा 2004 रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. 'श्वास' हा मराठी चित्रपट आजोबा आणि नातवाच्या नात्या भोवती फिरणारा आहे. हा चित्रपट पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर 50 वर्षानंतर 'श्वास' या मराठी चित्रपटाला 2004 मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 2005मध्ये 'श्वास' चित्रपटाला भारतातून ऑस्करसाठी अधिकृतपणे नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदिप सावंत यांनी केलंय. हा चित्रपट हिंदी, बंगाली, तमिळ भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप सावंत, अरुण नलावडे, देवीदास बापट हे आहेत.
4 'चिमणी पाखरं' : या चित्रपटात पद्मिनीचं लग्न एका मद्यपी शेखरशी झाले आहे. या जोडप्याला चार मुले आहेत. शेखरच्या व्यसनामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्याच्या मृत्यूनंतर पद्मिनीला तिच्या गंभीर आजाराबद्दल कळते, ज्यामुळे तिच्या चिंतेत असते. यानंतर ती आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे, यासाठी थडपड करताना दिसते. हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटानं 1.15 कोटीची कमाई केली आहे. 'चिमणी पाखरं ' या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र चाटे, मच्छिंद्र चाटे हे आहेत. हा चित्रपट 1 जानेवारी 2000 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरी, सचिन खेडेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिय बेर्डे, सिल्क टिपनीस आणि इतर कलाकार दिसले आहेत.
5 'बाबू बॅन्ड बाजा' : 'बाबू बॅन्ड बाजा' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2.10 कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती नीता जाधव यांनी केली आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे, विवेक चाबुकस्वार, मिताली जगताप वराडकर, संजय कुलकर्णी हे कलाकार दिसले आहेत. या चित्रपटाची कहाणी जग्गू नावाच्या एका स्थानिक बॅन्ड वाजणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे.