मुंबई - SHILPA WATCHES DAIVA KOLA : अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं तिच्या कुटुंबासह मंगळुरूला भेट दिली आणि कर्नाटकातील तुळू भाषिक प्रदेशातील 'दैवा कोला' प्रथेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तिनं इंस्टाग्रामवर तिच्या अनुभवाबद्दल पोस्टमध्ये लिहिले आणि सांगितलं की ती तिच्या मुलांना तिच्या वांशिक पार्श्वभूमीची ओळख करून देत आहे.
'दैवा कोला' हे कर्नाटकातील तुलु भाषिक जिल्ह्यांतील एक रंगीबेरंगी विधींचं नृत्यकला प्रदर्शन आहे. रविवारी शिल्पा शेट्टी आपल्या मुलांसह आईबरोबर दैवी कोला विधींसाठी उपस्थित होती. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या निवेदनात आपल्या मुलांना तिच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीची ओळख करून देत असल्याचे सांगितले. तिने तिच्या गावी तिच्या सुखद अनुभवाचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे.
शिल्पाने तिची मुलं विआन आणि समिशा यांच्यासोबत मंगळुरूमधील कोडामंताया दैवा कोला पाहिला. तिनं एका निवेदनात लिहिलं की तिची मुले हा परफॉर्मन्स पाहून थक्क झाली. "तुलुनाडू दा पोन्नू (तुलुनाडूची मुलगी) आपल्या मुळांपाशी परतली. माझ्या सांस्कृतिक वैभवाची ओळख मी माझ्या मुलांना करुन दिली. मंगळुरू येथील नागमंडला आणि पारंपारिक कोडामंतया दैव कोलाला उपस्थित राहिले. माझी मुलं आश्चर्यचकित झाली आणि कितीही वेळा मी पाहिले असले तरी फरक पडत नाही, मी ते पाहते, अशा भक्तीने सामर्थ्य आणि विश्वासाचे अनुसरण करणे मला नेहमीच भुरळ घालते." असं शिल्पानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.