मुंबई : 'सनम तेरी कसम' या बॉलिवूड चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेननं अभिनेता अमीर गिलानीबरोबर लग्न केलं आहे. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय अनेक भारतीय सेलिब्रिटींनी मावराला तिच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 5 फेब्रुवारी रोजी मावरानं तिच्या चाहत्यांना लग्नाचे फोटो दाखवून एक सुंदर भेट दिली आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मावरा आणि तिचा पती अमीर खूप देखणे दिसत आहेत. मावराचे फोटो आता अनेकांना आवडत आहेत. लग्नाचे फोटो शेअर करताना या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'आणि आयुष्याच्या या धावपळीच्या काळात... मला तू सापडलास. बिस्मिल्लाह 5.2.25.'
'सनम तेरी कसम' फेम मावरा होकेननं केलं लग्न : याशिवाय मावरानं आणखी लग्नामधील खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मिस्टर अॅन्ड मिसेस गिलानी मावरा अमीरची झाली.' आता या पोस्टवर अनेकजण चाहते मावराला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान मावरा आणि अमीरच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं हलक्या हिरव्या रंगाचा भरतकाम केलेला लेंहगा परिधान केला आहे. यावर तिनं सुंदर दागिने घातले आहे. दुसरीकडे अमीरनं काळा कुर्ता-पायजमा घातला आहे. दरम्यान 'सनम तेरी कसम'चे निर्माते दीपक मुकुट यांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा निकाहचा फोटो पोस्ट केला आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मावरा होकेनची इंस्टाग्राम स्टोरी : दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी सिंगनं मावराच्या पोस्टवर कमेंट केली आणि तिचे अभिनंदन केले आहे. मौनी रॉयनं देखील कमेंट सेक्शनमध्ये एका नोटसह लिहिलं, 'मनापासून अभिनंदन. पुढचा प्रवास तुम्हा दोघांसाठी आनंददायी आणि अर्थपूर्ण होवो. शुभेच्छा.' तसेच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी, राम चरणची पत्नी उपासना, सानिया मिर्झा आणि इतरांनी देखील मावराच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच मावरानं हर्षवर्धन राणेबरोबर 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 5 फेब्रुवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुन्हा एकदा 7 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.